सोलापूर : मुरूम उपसा प्रकरणात आरोपीला मदत करतो म्हणून तब्बल साडेसात लाखांची लाच मागणाऱ्या सलगर वस्ती पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संपत पवार व सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहन खंडागळे यांना शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडण्यात आले.
सलगर वस्ती पोलिस ठाणे अंतर्गत अवैद्य मुरूम उपसा प्रकरणात गुन्हा दाखल होता, सदर आरोपीला या गुन्ह्यात मदत करतो म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपत पवार व त्यांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक खंडागळे यांनी साडेसात लाखाच्या लाचेची मागणी केली होती, एवढ्या मोठ्या लाचेची मागणी केल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली.
शुक्रवारी रात्री साडेसातच्या सुमारास जुना पुना नाका याठिकाणी लाच घेताना अँटी करप्शन विभागाने छापा टाकला. दोन पोलिस अधिकाऱ्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरोधात फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती.