श्रीपूर : रस्त्यालगतच्या कॅनालरुन चोरुन तीन गोण्यांतून दारु घेऊन निघालेल्या दुचाकीवरील दोघांपैकी एकाला पोलिसांनी गाठून पकडलं. याप्रकरणी अकलूज पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा नोंदला. सोमवारी ही कारवाई करण्यात आली.
९ ऑगस्ट रोजी पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांना माळीनगर रस्त्यालगत कॅनॉलवर दोन व्यक्ती मोटारसायकलवरून काळ्या रंगाच्या गोणीतून ही दारू घेऊन निघाल्या होत्या. दरम्यान, पोलिसांनी वाहनासह ३५ हजारांची दारू पकडली. हवालदार आबासाहेब कुंभार, पाेलीस नायक शिवाजी जाधव, शिंदे, नितीन लोखंडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
याप्रकरणी पोलिसांनी गणेश मनोहर चव्हाण (वय २८, रा. महर्षी कॉलनी, अकलूज), अमोल कांतिलाल फुले (वय २८, रा. जोशी गल्ली, अकलूज) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस नायक शिवाजी जाधव यांनी फिर्याद दिली.
---------
फोटो : १० अकलूज
अकलूज पोलिसांनी दुचाकीसह दारू पकडली