सोलापूर जिल्ह्याच्या सरहद्दीवर पिलीव घाटात एसटी बस व मोटारसायकलवर झालेल्या दगडफेक घटनेमुळे पोलिसांनी आसपासच्या सर्व पोलीस ठाण्यांमधील गुन्हेगारांचे रेकॉर्ड तपासले. काही भागात वेशांतर करून या प्रकरणाचा अखेर छडा लावला. आटपाडी (जि. सांगली) व देवापूर (ता. माण, जि. सातारा) येथील आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. यापैकी पाच संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दोघे विधीसंघर्षग्रस्त बालक आहेत. या घटनेनंतर सातारा, सोलापूर व सांगली जिल्ह्यांतील काही अधिकाऱ्यांनी भेट दिल्यामुळे ही घटना गाजली होती. या घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके, पंडित मिसाळ, दत्ता खरात, समाधान शेंडगे, सोमनाथ माने, सतीश धुमाळ, अन्वर आत्तार करीत आहेत.
----