शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
7
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
8
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
9
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
10
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
11
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
12
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
15
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
16
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
17
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
18
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
19
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
20
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?

सोलापूर जिल्ह्यात दोन ठिकाणी पोलीसांच्या धाडी; ४.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त, १५ आरोपी ताब्यात, पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 12:27 PM

जिल्ह्यातील दोन ठिकाणी पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने धाडी टाकून तब्बल ४ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात  कुर्डू (येथील) जुगार अड्ड्याच्या धाडीत २ लाख ३८ हजार रुपये तर अक्कलकोट येथील धाडीत १ लाख ९३ हजार १२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दोन्ही धाडीत एकूण १५ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

ठळक मुद्देजिल्ह्यात सुरु असलेल्या अवैध धंद्याच्या विरोधात ग्रामीण पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतलीजिल्हा पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी सर्व पोलीस ठाण्यांसह, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांना रेकार्डवरील गुन्ह्याबरोबर जुगार, मटक्याच्या विरोधात कारवाई सुरु ठेवण्याचे आदेश

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १५ : जिल्ह्यातील दोन ठिकाणी पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने धाडी टाकून तब्बल ४ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात  कुर्डू (येथील) जुगार अड्ड्याच्या धाडीत २ लाख ३८ हजार रुपये तर अक्कलकोट येथील धाडीत १ लाख ९३ हजार १२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दोन्ही धाडीत एकूण १५ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कुर्डू येथे जुगार अड्डा सुरू असल्याची तक्रार खबºयाकडून विशेष पथकाला मिळाली. त्यानुसार धाड टाकली असता कुर्डू ते लऊळ हद्दीच्या शिवारात पोपट माळी यांच्या वीटभट्टीच्या मागे मन्ना नावाचा जुगार चालू असल्याचे दिसून आले. पोलिसांनी या धाडीत २ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी सात जणांना ताब्यात घेतले. यामध्ये पोपट नरसू माळी, संतोष संताजी पाटील, संभाजी कृष्णा गायकवाड, मोहन रघुनाथ उपासे, बिभीषण राजाराम जगताप, दत्ता बापू गायकवाड, हणमंत रामचंद्र जगताप (सर्व रा. कुर्डू, ता. माढा) यांचा समावेश आहे. ही कारवाई मंगळवारी सायंकाळी करण्यात आली. या आरोपींविरुद्ध कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे. दुसरी धाड अक्कलकोट शहरामध्ये ए-वन चौक, विजय चौक व कारंजा चौकातील मटका बुकीवर टाकण्यात आली. यात १ लाख ९३ हजार १२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ८ जणांना ताब्यात घेतले. यामध्ये खासीम गुलाब शिकलगार (वय ३२, रा. स्टेशन रोड, अक्कलकोट), स्वामीराव मारुतीराव लोखंडे (वय ५५, रा. जैन मंदिरासमोर, अक्कलकोट), दीपक बाळू फुटाणे (वय २२, रा. जुना अडत बाजार अक्कलकोट), अभिजित विक्रम पवार (वय ३५, रा. समर्थनगर), लतिफ हनिफ सातलगाव (वय ५६, रा. नागनहळ्ळी), अकबर हबीर सुतार (वय ३३, रा. संजयनगर, अक्कलकोट), सैफन हबीर सुतार (वय ३८, रा. अक्कलकोट), प्रशांत सुरेश जमादार (वय २६, रा. मैंदर्गी) यांचा समावेश आहे.कारवाई पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील सपोनि संदीप धांडे, हवालदार अंकुश मोरे, पोलीस अमृत खेडकर, बाळराजे घाडगे, सुरेश लामजाने, सागर ढोरे-पाटील, अमोल जाधव, बालाजी नागरगोजे, फौजदार जी. एच. निंबाळकर , हवालदार मनोहर माने, पो.कॉ. अक्षय दळवी, पांडुरंग केंद्रे, श्रीकांत जवळगी, अनुप दळवी, सुरेश लामजाने, विलास पारधी, सिद्धाराम स्वामी, विष्णू बडे यांच्या पथकाने केली.------------------------अवैध धंद्याविरुद्ध विशेष मोहीम- जिल्ह्यात सुरु असलेल्या अवैध धंद्याच्या विरोधात ग्रामीण पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी सर्व पोलीस ठाण्यांसह, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांना रेकार्डवरील गुन्ह्याबरोबर जुगार, मटक्याच्या विरोधात कारवाई सुरु ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ही कारवाई निरंतर सुरु राहणार असल्याचे सांगण्यात आले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस