लवटे याच्या घराजवळील उकिरडा शोधला असता त्यामध्ये एका स्टीलच्या डब्यात एक देशी बनावटीचे गावठी पिस्टल व एक जिवंत काडतूस मिळून आले. त्यानंतर त्याच्या घराची झडती घेतली असता तलवार मिळून आली. मिळालेले देशी बनावटीचे पिस्टल, एक जिवंत काडतूस व तलवार असा एकूण ५१ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी संशयिताकडे चौकशी केली असता त्याने या वस्तू श्रीदेवी सुरेश काळे या महिलेने ठेवल्याचे सांगितले.
त्यानुसार स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने जनार्दन लवटे व श्रीदेवी काळे यांच्यावर मोहोळ पोलीस ठाण्यात शस्त्रप्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस फौजदार पितांबर शिंदे हे करीत आहेत.
फोटो
११मोहोळ-क्राईम
ओळी
सोलापूर गुन्हे अन्वेषण पथकाच्या कारवाईत ताब्यात घेतलेल्या व्यक्तीसह मोहोळचे पोलीस.