माळशिरस : पोलिसांनी शहरातील अवैद्य धंद्यांवर कारवाईचा धडाका सुरू केला आहे. शहरातील रुग्णालयाशेजारील पडक्या जागेत मन्ना नावाचा डाव रंगला असताना, पोलिसांची धाड टाकली. जुगार खेळणाऱ्या सात जणांवर कारवाई करीत, एक शासकीय कर्मचारी व शहरातील प्रतिष्ठित व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार, शहरातील रुग्णालयाशेजारील पडक्या जागेत गोलाकार बसून, ५२ पत्त्यांची पाने हातात धरून मन्ना नावाचा जुगार पैशांवर खेळला जात असल्याची माहिती मिळाली. पोलीस निरीक्षक दीपरत्न गायकवाड यांच्या पथकाने या ठिकाणी धाड टाकली. या कारवाईत सात जण ५२ पत्त्यांची पाने व रोख रक्कम ७५० रुपये जप्त केली. याबाबत माळशिरस पोलिसांनी जुगार खेळणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या कारवाईत अनिल चव्हाण, नंदकुमार घाडगे, प्रदीप चव्हाण, अभिजीत जगताप, विकास ननवरे, दत्तात्रय ठेगल, विजय घाडगे (सर्व रा.माळशिरस) या सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस निरीक्षक दीपरत्न गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली अनिल गायकवाड, सोमनाथ माने, अभिमान परांडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.