शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
3
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
4
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
5
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
6
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
7
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
8
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
9
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
10
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
11
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
12
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

बार्शीतील पोलीस निवासस्थानांची दुरवस्था; शौचालय ड्रेनेजचे पाईप फुटल्याने सर्वत्र दुर्गंधी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 12:25 PM

रंग गेलेल्या भिंती, छोट्या खोल्या : ड्रेनेजचे पाईप फुटल्यामुळे घाणीच्या साम्राज्याची दुर्गंधी

ठळक मुद्देअनेक खोल्यांचे छत गळत आहे. कित्येकांचे धपले पडत आहेत, अनेक रूमच्या फरशा फुटल्या गळक्या असलेल्या ड्रेनेजमुळे सर्वत्र दुर्गंधी पसरल्यामुळे रोगराई होण्याची भीतीयाठिकाणी राहणारे पोलीस व त्यांच्या कुटुंबांना जीव धोक्यात घालूनच राहावे लागत आहे

बार्शी : बार्शीतील पोलीस निवासस्थानांची दुरवस्था झाली असून, अनेक खोल्यांचे छत गळत आहे. कित्येकांचे धपले पडत आहेत, अनेक रूमच्या फरशा फुटल्या असून, गळक्या असलेल्या ड्रेनेजमुळे सर्वत्र दुर्गंधी पसरल्यामुळे रोगराई होण्याची भीती निर्माण झाली आहे़ याठिकाणी राहणारे पोलीस व त्यांच्या कुटुंबांना जीव धोक्यात घालूनच राहावे लागत आहे.

बार्शी शहर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या पोलिसांच्या कुटुंबांना राहण्यासाठी बार्शी शहरात तीन पोलीस वसाहती आहेत़ यातील दोन उपळाई रोडवर आहेत, तर काही वर्षांपूर्वी बसस्थानक रोडवर नवीन पोलीस वसाहत बांधण्यात आली आहे़ या वसाहतीमध्ये साधारणत: एक खोली आणि किचन असे स्वरूप असलेले ५२ ब्लॉक आहेत़ त्याठिकाणी ५२ कुटुंबे राहत आहेत.

या वसाहतीची मोठी दुरवस्था झाली असून, वारंवार निवासस्थानातील प्लास्टर कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. तसेच शौचालय ड्रेनेजचे पाईप फुटल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. या निवासस्थानात अनंत अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने व येथे राहणाºया पोलीस कुटुंबीयांस वारेमाप खोलीभाडे असल्याने पोलिसांना इथे राहणे म्हणजे ‘असून अडचण, नसून खोळंबा’ ठरत आहे. या वसाहतीमधील ब्लॉकही लहान असून, एक रूम आणि किचन म्हणजे वन आरके असे स्वरूप आहे़ गळके छप्पर, वाढलेले गवत, उंदीर-घुशींचा त्रास, स्वच्छतागृहाचे तुटलेले दरवाजे, फुटलेले पाईप यामुळे पसरलेली दुर्गधी, असा त्रास याठिकाणी राहणाºयांना सहन करावा लागत आहे़ 

अधिकाºयांकडून साधी पाहणीदेखील नाही...- इतकी गंभीर परिस्थिती असतानाही सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी साधी पाहणी करण्याकरिताही येत नसल्याची खंत येथील कर्मचाºयांच्या कुटुंबांकडून व्यक्त करण्यात आली. यामुळे येथे राहण्यासाठी पोलीस कर्मचारी उदासीन आहेत. समोर असलेल्या मोकळ्या मैदानात जप्त करून आणलेली काही वाहने व ट्रक उभा असल्यामुळे मुलांना खेळण्यासही अडचण होत आहे़ देखभाल व दुरुस्तीवर वर्षभरात काहीच खर्च झाला नसल्याचे सांगण्यात आले. या मागणीची तातडीने दखल घेऊन देखभाल दुरुस्ती, रंगरंगोटी व स्वच्छता करावी, अशी मागणी पोलिसांच्या कुटुंबीयांनी केली आहे.

पोलीस निरीक्षकांच्या सूचनेवरून आम्ही सदर वसाहतीची पाहणी करून दुरुस्तीसाठी किती पैसे लागतात, याचा प्रोगॅ्रम तयार करून जिल्हा पोलीस प्रमुखांकडे पाठवून दिला आहे़ त्यांच्याकडून मंजुरी आल्यानंतर दुरुस्तीचे काम हाती घेतले जाईल़ - सुनीता पाटील उपअभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग, बार्शी़ 

या विषयात लक्ष घालून वसाहतीमध्ये करावयाच्या दुरुस्ती व इतर कामांच्या खर्चाचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तयार करून आमच्या वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला आहे़ त्याला मंजुरी मिळताच बांधकाम विभागाकडून दुरुस्ती करून घेतली जाईल़ - सर्जेराव पाटील पोलीस निरीक्षक बार्शी शहर 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसPoliceपोलिस