पोलीस नाईक धनंजय अवताडे, नागेश निंबाळकर, पोलीस कॉन्स्टेबल सिद्धनाथ शिंदे ७ जून रोजी वाढेगाव हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यांना सावे येथील माण नदीपात्रात काही लोक पिकअपमध्ये चोरून वाळू भरण्यासाठी गेल्याची माहिती मिळाली. त्याआधारे पोलीस तेथे गेले असता चालक-मालक पिकअपमध्ये वाळू चोरून घेऊन जाण्याच्या उद्देशाने नदीपात्रात उतरले होते. परंतु त्यांना पोलीस आल्याची चाहूल लागताच ते तेथून पळून गेले.
दुसऱ्या कारवाईत पोलीस नाईक धनंजय अवताडे, पोलीस नाईक नागेश निंबाळकर, पोलीस कॉन्स्टेबल अमर पाटील, होमगार्ड कचरे हे सांगोला शहरात सेक्टर नंबर १ व २ हद्दीत पेट्रोलिंग करत होते. यावेळी वासूद येथील काही लोक टेम्पो घेऊन माण नदीपात्रातून चोरून वाळू भरण्यासाठी गेल्याची माहिती मिळाली. त्याआधारे पोलीस तात्यासो केदार यांच्या घरासमोर गेले असता एमएच १४ /एएस ४०४४ हा टेम्पो वाळू भरण्यापूर्वीच ताब्यात घेतला. पोलीस आल्याचे पाहून अज्ञात चालक-मालक तेथून पळून गेले. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल सिद्धनाथ शिंदे व अमर पाटील यांनी अज्ञात चालक-मालकाविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.