वैराग : येथील पोलीस स्टेशनचा दूरध्वनी सुमारे चार महिन्यापासून बंद आहे. तो तत्काळ चालू करून नागरिकांची सोय करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे.
पोलीस स्टेशन अंतर्गत वैराग शहरासह चाळीस गावे येत असून येथे विविध कारणावरून सतत तक्रारी होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. तेव्हा अशा वेळी सुज्ञ नागरिक प्रथम पोलीस स्टेशनशी संपर्क साधून पोलिसांना बोलावून वाद थांबण्याचा प्रयत्न करत असतात. तरी देखील पोलीस स्टेशनने अद्याप फोन का चालू करून घेतला नाही, असा सवाल निर्माण होत असून तत्काळ तो दुरूस्त करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
---
यापूर्वीही जेव्हा फोन बंद पडला तेव्हा तेव्हा बीएसएनएलच्या संबंधित कर्मचाऱ्यांना फोन केल्यावर ते दुरूस्त करून देत होते. त्याप्रमाणेच येथील पोलीस कर्मचाऱ्यांनी संबंधित ऑपरेटरला सांगितले असून तक्रारही नोंदवली आहे. आजच दूरध्वनी दुरुस्त करून घेतील.
- विजय बहिर, पोलीस निरीक्षक
----
आमच्याकडे तक्रार आल्यास आम्ही लगेच फोन चालू करतो. हा तर पोलीस स्टेशनचा अतिमहत्वाचा फोन बंद पडला आहे. मात्र पोलीस स्टेशनने याबाबत तक्रार नोंदवली नाही. म्हणून फोन बंद पडल्याचे समजले नाही. तरीही लवकरात लवकर तो दुरूस्त करून दिला जाईल.
- दूरध्वनी ऑपरेटर
---