सर्वांना सोलापूर येथील बाल संरक्षण समितीसमोर हजर केले. अल्पवयीन मुलगी, तिच्या आई, वडिलांसह चौघांना समुपदेशनासाठी ताब्यात घेतले आहे. उत्तर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे. यामुळे या भागात एकच खळबळ उडाली आहे.
अधिक माहिती अशी की, बादोले येथे २८ मे रोजी पहाटे साडेपाच वाजता अल्पवयीन मुलीशी विवाह होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलीस अंगद गीते, राम चौधरी, बिपीन सूर्यवंशी यांनी सोबत तालुका बाल संरक्षण समितीचे प्रमुख बालाजी अल्लडवाढ यांना सोबत घेऊन पहाटेच्या वेळी गावात पोहचले.
पोलिसांनी मुलीच्या वयाची पडताळणी केली असता १८ वर्ष पूर्ण होण्यास आणखी १३ महिने कमी असल्याचे निदर्शनास आले. त्यावरून मुलीच्या आई, वडिलांना ताब्यात घेतले. सोलापूर येथील बाल संरक्षण समितीसमोर उभे केले असता, त्यांना चार दिवस समुपदेशन करण्यासाठी ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सापळा रचून कारवाई केली आहे. ही कारवाई पोलीस व तालुका बाल संरक्षण समिती यांच्यासह संयुक्तपणे करण्यात आली.