संगणक कक्षात भरलेला फॉर्म तहसीलमध्ये जमा करण्यासाठी रांगाच्या रांगा लागलेल्या दिसून आल्या. तालुक्यातील निमगाव (टे),जामगाव, अरण, वडाचीवाडी( त.म ), वाकाव, माळेगाव, मोडनिंब, सापटणे(भो) यासह महत्त्वाची ११ गावे ही या निवडणुकीत बिनविरोध होण्याच्या मार्गावर आहेत.
तालुक्यातील निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायतींमुळे गावपातळीवरील राजकीय वातावरण गरमागरम झालेले आहे. त्यातच ग्रामपंचायत सदस्य निवडीनंतर यंदा प्रथमच सरपंच पदाचे आरक्षण ठरणार असल्याने गावातील पार्टीप्रमुखही सावध भूमिका घेत आपल्या मर्जीतील उमेदवार निवडण्यात व्यस्त आहेत. यंदा निवडणूक लढविण्यासाठी सातवी पासची अट असलयानेही अनेक इच्छुकांची गोची झाली आहे.
येथील ८२ ग्रामपंचायतींपैकी माढा विधानसभा मतदारसंघातील ६१, तर करमाळा विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असणाऱ्या २१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागलेल्या आहेत. माढा तालुक्यातील प्रमुख नेते असलेले आ. बबनराव शिंदे व आ. संजयमामा शिंदे या दोन आमदारांचे गाव असलेले निमगाव (टे, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक प्रा. शिवाजीराव सावंत यांची वाकाव, शिवसेनेचे नेते संजय कोकाटे यांचे माळेगाव, जिल्हा परिषदेचे माजी सभापती शिवाजी कांबळे व भारत शिंदे यांचे अरण, सरपंच संघटनेचे राज्याध्यक्ष जयंत पाटील यांचे कुर्डू, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कैलास तोडकरी यांची मोडनिंब, उच्च पदस्थ सनदी अधिकाऱ्यांचे गाव उपळाई (बु) या ग्रामपंचायतींचाही यात समावेश आहे. यामुळे या ठिकाणी काय होणार याकडे इतर नेत्यांचे लक्ष लागले आहे.
एकूणच गावागावांत ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा उडाला आहे. त्यामुळे तेथील कार्यकर्ते व गावपुढारी आपली पार्टी कशी सत्तेवर निवडणून येईल याकडे लक्ष केंद्रित करून लढत आहेत.
----
बिनविरोध मार्गावरील गावे
बिनविरोध होण्याच्या मार्गावर असणाऱ्या चर्चेतील ग्रामपंचायतींमध्ये जामगाव, वडाचीवाडी (त.म.), निमगाव (टे.), चव्हाणवाडी (टे.), अरण, सुर्ली, पालवण, धानोरे, खैराव, महातपूर, सापटणे (भो.), मोडनिंब, फूटजवळगाव, लोंढेवाडी, उंदरगाव, केवड, वडाचीवाडी (उ.बु.), सुलतानपूर, वेताळवाडी यांचा समावेश आहे.
----
माढा तालुक्यात निवडणुका लागलेल्या ग्रामपंचायती-८२,
एकूण ग्रामपंचायत सदस्य जागा संख्या-७३८,
एकूण मतदान केंद्र-३२१,
एकूण मतदार-१,६०,५६८,
पुरुष मतदार-८४,१५५,
स्री मतदार-७६,४१३.