शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

महापालिका सभेत राजकारण ; स्वपक्षातील मंडळींवर सोलापुरच्या महापौर संतापल्या, आमचेच लोक विरोधकांना पुरवतात रसद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 2:21 PM

सोलापूर : आमच्या पक्षातील काही लोक विरोधकांना रसद पुरविण्याचे कारस्थान करतात. त्यांनी दिलेली कागदपत्रे दाखवून विरोधक सभेत माझ्यावर प्रश्नांची ...

ठळक मुद्देएमआयएमचे नगरसेवक तौफिक शेख यांचे सदस्यत्व रद्द करण्याबाबतचा अहवालमहापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे रजेवर होते. या सभेत अनेक नगरसेवक अनुपस्थित माजी आमदार युन्नूस शेख यांचा महापालिकेच्या वतीने मानपत्र देऊन सत्कार करण्यास मान्यता

सोलापूर : आमच्या पक्षातील काही लोक विरोधकांना रसद पुरविण्याचे कारस्थान करतात. त्यांनी दिलेली कागदपत्रे दाखवून विरोधक सभेत माझ्यावर प्रश्नांची सरबत्ती करतात. खरं तर प्रश्न विचारणाºया नगरसेवकांनी आणि त्यांना रसद पुरविणाºयांनी मागचा इतिहास काढून पाहावा. सभागृहाचे कामकाज नियमाप्रमाणेच चालत आहे. चालत राहील, असा विश्वास महापौर शोभा बनशेट्टी यांनी सोमवारी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.  

महापालिका आयुक्तांकडून आलेली अनेक प्रकरणे सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर का येत नाहीत, असा प्रश्न काँग्रेसच्या नगरसेवकांनी सोमवारी सर्वसाधारण सभेत उपस्थित केला. 

या प्रकरणांची यादी त्यांनी पत्रकारांना दिली. ही यादी सहसा नगरसेवकांना मिळत नाही. पण ती थेट काँग्रेसच्या हाती लागली. त्यावरुन कुजबूज सुरू झाली. त्याबद्दल महापौर शोभा बनशेट्टी म्हणाल्या, हे सगळं स्वपक्षातील लोकांचे कारस्थान असते. आमच्या पक्षातील लोक विरोधकांना रसद पुरवितात. 

प्रशासनाकडून आलेल्या विषयांबाबत निर्णय घेण्याचा अधिकार महापौरांना आहे.  काही विषयांची पूर्ण माहिती घ्यावी लागते. पक्षाच्या बैठकीत  काही लोकांनी हा मुद्दा काढला होता. तिथे त्यांची डाळ शिजली नाही. म्हणून मग विरोधकांना कागद पुरविले जातात. वास्तविक जे लोक प्रश्न विचारत आहेत त्यांनी प्रगतीपुस्तक काढून बघावे. ९० दिवस संपल्यानंतर विषय घेतले. मी आज सभागृहात सांगितलंय की मी खंबीर आहे. 

कोरमवर प्रश्नचिन्ह, आयुक्तांवर आरोप- महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे रजेवर होते. या सभेत अनेक नगरसेवक अनुपस्थित होते. सभेच्या कोरमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. नागणे-देशमुख वसाहत येथील ड्रेनेजलाईनचे काम तातडीने पूर्ण होत नाही. आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे नागरिकांशी नीट बोलत नाहीत, असा आरोप विनायक विटकर यांनी केला. किसन जाधव यांनी आयुक्त राजकारण करीत आहेत, असा आरोप केला. 

तौफिक शेख यांच्या सदस्यत्वासह इतर विषय प्रलंबित- आयुक्तांकडून आलेल्या प्रकरणांमध्ये एमआयएमचे नगरसेवक तौफिक शेख यांचे सदस्यत्व रद्द करण्याबाबतचा अहवाल, बुधवार पेठ सफाई कामगार वसाहतीतील धोकादायक इमारत, मागासवर्गीय वस्ती सुधारणा योजनेतील कामांचे विविध प्रस्ताव, २५६ गाळे येथे सार्वजनिक खासगी भागीदारी अंतर्गत घरकुल बांधणे, शहरात रोड साईड लिटर बिन बसविणे, जलशुध्दीकरण केंद्र, जलतरण तलाव यांना मालाचा पुरवठा करणे आदी विषयांचा समावेश आहे. ही प्रकरणे सभेच्या अजेंड्यावर का घेतली असा प्रश्न काँग्रेसच्या नगरसेवकांनी विचारला. 

सभेतील काही महत्त्वपूर्ण ठराव

  • माजी आमदार युन्नूस शेख यांचा महापालिकेच्या वतीने मानपत्र देऊन सत्कार करण्यास मान्यता
  • मिळकतकराचे आॅनलाईन पेमेंट केल्यास मिळणार पाच टक्के सवलत
  • परिवहनकडील स्क्रॅप बसचा लिलाव होणार. 
  • परिवहनच्या  बसच्या तिकीट दरात वाढ.
टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाBJPभाजपाPoliticsराजकारण