शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
3
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
4
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
5
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
6
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

सोलापूर लोकसभेसाठी उद्या मतदान; मध्यप्रदेश पोलिसांसह ३ हजार पोलीसाचा असणार बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 10:45 AM

लोकसभा निवडणुकीच्या मतदानानिमित्त शहरात मध्यप्रदेशसह अन्य भागातील अतिरिक्त पोलिसांचा बंदोबस्त दाखल झाला आहे. मतदानासाठी ७७७ मतदान केंद्रे असून, तीन हजारांपेक्षा जास्त कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देशहरात दाखल झालेल्या पोलीस कर्मचाºयांना पोलीस आयुक्तालयाच्या वतीने प्रशिक्षण दिले जाणारशहरातील संवेदनशील केंद्रे, संवेदनशील भाग तेथील परिस्थिती आदींची सखोल माहिती दिली जाणार प्रशिक्षणानंतर पोलीस अधिकारी व कर्मचाºयांचा बंदोबस्त लावला जाणार

सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या मतदानानिमित्त शहरात मध्यप्रदेशसह अन्य भागातील अतिरिक्त पोलिसांचा बंदोबस्त दाखल झाला आहे. मतदानासाठी ७७७ मतदान केंद्रे असून, तीन हजारांपेक्षा जास्त कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 

लोकसभेची मतदान प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या वतीने मोठा पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला आहे. बाहेरून एक पोलीस उपायुक्त, ९ सहायक पोलीस आयुक्त, १२ पोलीस निरीक्षक, ७0 फौजदार, ३५0 पोलीस कर्मचारी, ११00 होमगार्ड, गोंदिया व सोलापूर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे दोन तुकड्या शहरात दाखल झाल्या आहेत.

शहर पोलीस आयुक्तालयातील तीन पोलीस उपायुक्त, तीन सहायक पोलीस आयुक्त, १४ पोलीस निरीक्षक, ५0 फौजदार आणि १ हजार ८00 पोलीस कर्मचारी नेमण्यात आले आहेत. बंदोबस्तासाठी आलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाºयांच्या राहण्याची सोय केगाव येथील ट्रेनिंग सेंटर, सिंहगड महाविद्यालय, विजापूर रोडवरील एसआरपीएफ कॅम्प आणि शहरातील सात पोलीस ठाण्यांच्या ठिकाणी करण्यात आली आहे. 

शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या वतीने जानेवारी २0१९ पासून २ हजार ४१५ आरोपींविरूद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. पाच सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए अन्वये कारवाई करून येरवडा येथील जेलमध्ये रवानगी केली आहे. 

२३ आरोपी जिल्ह्यातून तडीपार झाले आहेत. दारूबंदी कायद्यान्वये ६0१ गुन्हे दाखल झाले असून, ७८३ लिटर दारू जप्त केली आहे. या प्रकरणी ६४७ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. शहरात वेगवेगळ्या भागात करण्यात आलेल्या ३८६ नाकाबंदीदरम्यान ९ हजार ५00 वाहनांची तपासणी झाली आहे. २३ लाख ४८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हत्यार कायद्याखाली २१ गुन्हे दाखल झाले असून, दोन पिस्टल, ४ चॉपर व कुकरी, २६ तलवारी, एक एअर गन, तीन चाकू असा एकूण २ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शहरात बंदूक, पिस्टल, गन आदी शस्त्र असलेले एकूण ५१२ परवानाधारक आहेत. ४२७ शस्त्रे जमा करण्यात आली आहेत.

बाहेरील कर्मचाºयांना प्रशिक्षणच्निवडणुकीनिमित्त शहरात दाखल झालेल्या पोलीस कर्मचाºयांना पोलीस आयुक्तालयाच्या वतीने प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये मतदान बुथ केंद्राची माहिती, शहरातील संवेदनशील केंद्रे, संवेदनशील भाग तेथील परिस्थिती आदींची सखोल माहिती दिली जाणार आहे. प्रशिक्षणानंतर पोलीस अधिकारी व कर्मचाºयांचा बंदोबस्त लावला जाणार आहे. निवडणुकीसाठी बाहेरून एकूण १२३ वाहने भाड्याने घेण्यात आली आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकsolapur-pcसोलापूरPoliceपोलिसSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस