मंगळवेढा/मल्लिकार्जुन देशमुखे
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी व्हा. चेअरमन बबनराव आवताडे व श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीमधील डाळिंब लिलावामध्ये बुधवार १८ नोव्हेंबर २०२० रोजी डाळिंबास प्रति किलो ५११ रुपये विक्रमी दर मिळाला. यामुळे शेतकऱ्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून डाळिंब खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांचे व शेतकऱ्याचे बाजार समितीच्यावतीने अभिनंदन करण्यात आले.
निर्यातक्षम डाळिंबापेक्षा दुसऱ्यांदा एवढा जास्त दर मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी फटाक्याची आतिषबाजी करून आनंद व्यक्त केला. मोहन माळी या आडत दुकानी डाळिंब सौदयात रावसाहेब लवटे (रा.जत) या शेतकऱ्याच्या डाळिंबाला ५११ रु खरेदीदार राम बाबर (सांगोला) यांनी खरेदी केला, तर कुमार चिकोडी (रा.जत) व दत्ता धाइंगडे (रा.वाकी ता. सांगोला) या शेतकऱ्याला ५०२ रु खरेदीदार आकाश गुजर यांच्याकडून दर मिळाला. तर आनंद लवटे व सुरेश माळी (रा. जत) यांना दर मिळाला. आठवड्यातील प्रत्येक सोमवार, बुधवार व शुक्रवार दुपारी ४ वाजता डाळिंब सौदे लिलाव सुरू असतात यावेळी बाजर समितीचे सभापती सोमनाथ आवताडे, उपसभापती प्रकाश जुंदळे, सचिव सचिन देशमुख, मोहन माळी, रामचंद्र बाबर, आकाश गुजर, विनायक शेंबडे, भानुदास सलगर, दत्तात्रय शिंदे, विनायक आवताडे इत्यादी उपस्थित होते.
मंगळवेढा कृषि उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाने डाळिंब सौदे लिलाव सुरु केले. या सौदे लिलावत सोलापूर, पंढरपूर, सांगोला, जत, मोहोळ, कर्नाटक या भागातुन येणारी आवक वाढली आहे. मंगळवेढा मार्केट मधील खरेदीदार माल खरेदी करून दिल्ली, गुजरात, मुंबई, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, उत्तरप्रदेश, बिहार, आसामला माल पाठवत असल्याने डाळिंबास चांगला दर भेटत आहे. यामुळे शेतकऱ्याचे हित होत असून शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.