वाढेगाव येथील सुनील मोहन दिघे, दिलीप दामोदर गंगथडे व विजय मारुती माने हे तिघे पार्टनरशिपमध्ये डाळिंब ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करीत होते. २५ जुलै रोजी दिलीप गंगथडे व दिल्ली येथील जावेद नावाचा इसम रात्री ८ वाजता त्याच्या ट्रान्सपोर्ट ऑफिसला येऊन आम्ही येथे झोपतो व सकाळी लॉजला जाऊन आंघोळ करतो, असे म्हणून त्याने सुनील दिघे यास घरी पाठविले. दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३०च्या सुमारास दिलीप गंगथडे यांनी लॉजवर एक झंडू बामची बाटली व निसीप प्लस नावाची गोळी घेऊन ये म्हणून सांगितले.
त्या गोळ्या घेऊन सुनील दिघे व जावेद लॉजवर गेले असता रूमचा दरवाजा उघडा होता. दोघांनी दिलीप यास उठवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याची कसलीच हालचाल दिसून आली नाही म्हणून त्याचा चुलत भाऊ दादासो गंगथडे घडला प्रकार फोनवरून सांगितला. दादासो गंगथडे व दिलीपचे वडील दामोदर गंगथडे, सुनील दिघे, विजय माने या चौघांनी त्यास सांगोला ग्रामीण रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासून तो मयत झाल्याचे सांगितले. याबाबत सुनील मोहन दिघे यांनी खबर दिल्यावरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली आहे.