बाळासाहेब बोचरे । सोलापूर: ज्या बोराला कोरडवाहू शेतीतील केवळ बांधावरचं झाड म्हणून ओळखलं जायचं त्या बोराने आज कमालच केली असून,देशातल्या प्रमुख बाजारपेठेत तोरा मिरवत मानाचे स्थान मिळवलं आहे. त्याचबरोबर त्याला भावही चांगला मिळू लागल्याने एकरी पाच लाखांपर्यंत उत्पन्न मिळू लागले आहे.
बांधावरच्या या झाडाला कलम करून त्यापासून लिंबाएवढी कलमी बोरे उत्पादित करून त्यांना बाजारपेठेत स्थान मिळवून देण्यात कृषिभूषण स्व. ज्योतीराम गायकवाड यांचे योगदान मोलाचे आहे. गायकवाड यांनी ज्यावेळेला ही बोरे बाजारात आणली तेव्हा लोक त्याकडे आश्चर्याने पाहू लागले.
शहरी जनतेला मोफत बोरे खाऊ घालून स्व. ज्योतीराम दादांनी त्याची चटक शहरी लोकांना लावली. कालांतराने बोराच्या कडाका, उमराण, चमेली,मेहरून अशा विविध जातींची पैदास झाली आणि सोलापूर जिल्ह्णात बोराचे क्षेत्रही वाढत गेले.
कोरडे हवामान असल्याने सोलापूर जिल्ह्णातील फळांची चव वेगळीच असते. कमी पाण्यावर जगणाºया बोरीची सोलापूर जिल्ह्णातील अल्प पाणी असलेल्या भागातील शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात लागवड केली. जिल्हात सहा हजार हेक्टरच्यावर बोरीचे क्षेत्र आहे. बोर हे कोरडवाहू शेतीमधील फळपीक असून भुरी वगळता याला रोगाचा धोका नाही. किडीपासून वाचण्यासाठी एकदोन फवारण्या केल्या की काळजी मिटते.आपल्याकडे ज्यावेळेला पाणी टंचाई असते त्या काळात बोराला पाण्याची गरज नसते. शिवाय एखाद्या वर्षी दुष्काळ पडला तर बोरीची बाग मरत नाही, हे विशेष.
देगाव (ता. उत्तर सोलापूर) येथील शेतकरी चंद्रकांत करळे यांनी पहिल्याच उस मोडून दोन एकरात अॅपल बोराची लागवड केली आहे. पहिल्याच वर्षी चांगली फळधारणा झाली आहे. सध्या तोड चालू असून स्थानिक बाजारपेठेत ३५ रूपये किलो भाव मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. दोन एकरात किमान ४० टन उत्पादन मिळेल असा अंदाज असून उसाच्या तुलनेत बोरे चांगला फायदा देतील असा अंदाज असल्याचे करळे म्हणाले.
खंडाळी (ता. मोहोळ) शंकर श्रीखंडे यांच्याकडे बोर, डाळिंब व सीताफळाची बाग आहे. ते सगळी फळे गुलबर्गा येथे पाठवतात. बोराचे ३० टनाच्या वर उत्पन्न निघू शकते. मात्र बोरांना गोळा करण्यासाठी वेय आणि मजूर जास्त लागतात. पण किमान १० रूपये किलो भाव मिळाला तरी बोरे कोणत्याच पिकाला ऐकत नाहीत असा त्यांचा अनुभव आहे.
---------------....बांगलादेशालाही निर्यातआज संपूर्ण राज्यासह देशाच्या प्रमुख बाजारपेठेत सोलापूरची बोरे लोकप्रिय आहेत. चेन्नई, कोलकत्ता, दिल्ली, बंगळूर या ठिकाणाहून व्यापारी खास बोरे खरेदीसाठी सोलापूरला येतात. सोलापूरची बोरे बांगलदेशला निर्यातही होतात. बोराचे एकरी २० ते २५ टन उत्पादन मिळू शकते. आज जवळच्या पुणे बाजारपेठेत बोराला १५ ते ६० रुपये भाव मिळत आहे. उमराण, कडाका, चमेली या बोरांना १८ ते २२ रुपयांपर्यंत भाव मिळत असून ही बोरे शेतकºयांना चार ते पाच लाख रुपये उत्पादन मिळवून देऊ लागली आहेत.
दूरदूरचे व्यापारी थेट शेतकºयांच्या बागेला भेट देऊन पुणे मार्केट यार्डात जो दर आहे त्या दराने खरेदी करत असल्याने शेतकºयांचा इतर खर्चही वाचला जात आहे. गेले दोन वर्षे ऊस आणि त्याचा दर याचा संघर्ष पाहता बोर उत्पादक सध्यातरी खूश आहेत. अलीकडेच जिल्ह्णात अॅपल बोरांची लागवडही वाढली आहे. या बोराला किमान ३५ ते ६० रुपये किलो असा भाव मिळत आहे. ही बोरे शेतकºयांना एकरी ९ लाखांपर्यंत उत्पन्न देऊ लागली आहेत.