सोलापूर : विनाकारण 'कोरोना' ची टेस्ट करायच्या भानगडीत जाऊ नका... नाहीतर चांगले असताना रिपोर्ट पॉझिटिव्ह येतात' अशी चुकीची पोस्ट फेसबुकवर अपलोड केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
14 एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता ही पोस्ट फेसबुक अकाऊंटवर शेअर केली आहे. त्यांच्याविरुद्ध राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 54 द्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कायद्यानुसार एक वर्ष शिक्षा होऊ शकते तसेच भारतीय दंड विधान कलम 188 अंतर्गत देखील त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियावर कोणत्याही अफवा पसरवणाऱ्या पोस्ट टाकू नयेत पोलिसांची सर्व सोशल मीडियावर करडी नजर असल्याची माहिती सोलापूरच्या सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरुण फुगे यांनी सांगितले.