सलग दोन वर्षाच्या समाधानकारक पावसामुळे यंदा पाण्याची परिस्थिती कोठेतरी सुधारली आहे. उन्हाळ्यामुळे शेतातील उभी पिके, फळपिके पाण्याला आली आहेत. मात्र महावितरण कंपनीकडून थकबाकीसह चालू विजबिल भरा अन्यथा वीज पुरवठा खंडित केला जाईल, या धोरणानुसार डीपीचा वीजपुरवठा खंडित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे सांगोला तालुक्यातील मांजरी, संगेवाडी, सावे, बामणी, देवळे, मेथवडे परिसरातील शेतकरी खंडित वीज पुरवठ्यामुळे हवालदिल झाले आहेत.
खंडित वीज पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांच्या बागायती व फळपिकांचे मोठे नुकसान होणार आहे. ते कधीही भरून न येणारे आहे. आम्ही सर्व शेतकरी एकत्र येऊन सर्वांकडे असणारी चालू वीज बिलासह थकबाकी टप्प्या-टप्प्याने भरण्यास तयार आहोत. परंतु वीज पुरवठा चालू करा, असे साकडे महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्यांना घातल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
यावेळी झेडपी सदस्य अतुल पवार, बाजार समितीचे सभापती गिरीश गंगथडे, पं.स. सदस्य नारायण जगताप, माजी उपसभापती संतोष देवकाते, माजी सरपंच जगदीश पाटील, डॉ. दादा जगताप यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो ओळ ::::::::::::::
शेती पंपाचा खंडित वीजपुरवठा तत्काळ सुरू करावा, मागणीचे निवेदन उपकार्यकारी अभियंता आनंद पवार यांना देताना अतुल पवार, गिरीश गंगथडे, नारायण जगताप, जगदीश पाटील, दादा जगताप आदी.