पानगांव : ढाळे पिंपळगांव मध्यम प्रकल्पावरील वीजपुरवठा रविवारी सकाळपासून बंद करण्यात आला. वीज बील वसुलीसाठी वीज वितरणने ही कारवाई केली. त्यामुळे प्रकल्पावरील सात गावामधील सुमारे ७०० उचल पाणी परवाना धारक शेतक-यांमधून संतापाची लाट उसळली आहे.
गेल्या वर्षभरात कोरोनामुळे बाजारपेठा बंद आणि चालू होत आहेत. बाजारभावाची हमी नाही. निसर्गाची अवकृपा या समस्यांना तोंड देत शेतकरी दिवस ढकलत आहेत. बॅंका, फायनान्स, पतसंस्था यांचा तगादा सुरूच आहे. त्यातच ऐन सुगीत वीज वितरणने वीजपुरवठा बंद केल्याने शेतक-यांच्या ऊस, भुईमूग, द्राक्ष, या पिकांचे नुकसान होत आहे.
वीजपुरवठा बंद केलेला कळल्यानंतर लगेच प्रकल्पावर शेतक-यांची गर्दी वाढू लागली. या निर्णयाच्या विरोधात आंदोलनाची दिशा ठरवण्याची बैठक पार पडली.
दरम्यान वीज वितरण कंपनीच्या जबाबदार अधिका-यांचे मोबाईल बंद असल्याचे स्पष्ट झाले.
--
२१ पानगाव
ढाळे पिंपळगांव मध्यम प्रकल्पापाचा वीजपुरवठा खंडीत केल्यानंतर जमा झालेले शेतकरी