राज्य शासनाने मागील थकीत वीजबिलात ५० टक्के माफीची घोषणा केली आहे. मात्र, २०१७ पासूनची कृषिपंपाची बिले अनेक शेतकऱ्यांना मिळालीच नाहीत. अनेक ठिकाणी कुठलीही पूर्वसूचना न देता डीपीतून वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे, हा प्रकार चुकीचा आहे. लोकांचे प्रबोधन करा, त्यांना पूर्वसूचना द्या, अशा सूचना केल्या. यावेळी आमदार शहाजी पाटील यांनी शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन पूर्वसूचना न देता कट करण्याऐवजी वाढीव वीज बिलाच्या तक्रारींचे निराकरण करून प्रति हॉर्सपॉवर १ हजार रुपयांप्रमाणे भरावेत, जिल्हा परिषद गटनिहाय कक्ष स्थापन करून वाढीव वीजबिलाच्या तक्रारीचे निराकरण करावे, स्पीकरच्या माध्यमातून सार्वजनिक सूचना करीत शेतकऱ्यांचे प्रबोधन करावे, अशा सूचना केल्या होत्या. त्यानुसार शेळवे गावात यासाठी मोठा प्रतिसाद मिळाला. तेथे अवघ्या काही दिवसांत ९ लाख रुपयांची वसुली झाली आहे. या प्रस्तावाला शेतकऱ्यांमधूनही प्रतिसाद मिळत आहे.
यावेळी बाबूराव गायकवाड, शहाजी नलवडे, तानाजी देशमुख, शिवसेना जिल्हा उपप्रमुख सुधीर अभंगराव, पंढरपूर तालुकाप्रमुख महावीर देशमुख, सांगोला तालुकाप्रमुख सूर्यकांत घाडगे, संजय घोडके, जयवंत माने, माऊली अष्टेकर, काका बुराडे, पोपट सावंतराव, अविनाश वाळके, तानाजी मोरे, दीपक गवळी, लुकमान इनामदार, शंकर मेटकरी, सचिन काळे, संतोष खडतरे, अर्जुन वाघ आदी उपस्थित होते.