शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे ते कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
3
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
4
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
5
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
6
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
7
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
8
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
9
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
10
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
11
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
12
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
14
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
15
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
16
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
17
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
18
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
20
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos

जंतूचा संसर्ग टाळण्यासाठी अन् डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी पीपीई सूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 12:29 PM

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी; कोरोना आजार संशियतांवर उपचार करण्यासाठी पुरेशी औषधे उपलब्ध

ठळक मुद्देकोरोना संशयित रुग्णांचे स्वॅप (नमुने) घेणे गरजेचे असतेस्वॅप घेताना डॉक्टरांना संसर्ग होण्याची भीती असतेजंतूचा संसर्ग  होऊ नये यासाठी स्पेशल सूट डिझाईन करण्यात आलेला असतो

शीतलकुमार कांबळे 

सोलापूर : कोरोना संशयित रुग्णांचे स्वॅप (नमुने) घेणे गरजेचे असते. स्वॅप घेताना डॉक्टरांना संसर्ग होण्याची भीती असते. त्यांना या जंतूचा संसर्ग  होऊ नये यासाठी स्पेशल सूट डिझाईन करण्यात आलेला असतो. त्याला पीपीई (पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट सूट) असे म्हणतात. सध्या जिल्हा प्रशासनाकडे असे १० सूट उपलब्ध असून, आणखी सूटची मागणी करण्यात आली आहे.

सध्या जिल्हा प्रशासनाकडे १० पीपीई सूट उपलब्ध आहेत. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, केगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्र व रेल्वे रुग्णालयात असे सूट वापरण्यात येत आहेत. एकदा हा सूट परिधान केल्यानंतर तीन तासांपर्यंत वापरता येतो. त्यानंतर त्याचा वापर करता येत नाही.  सध्या असे ड्रेस मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. दक्षता म्हणून आणखी सूट मागविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाºयांनी सांगितले. 

कोरोना आजार संशियतांवर उपचार करण्यासाठी पुरेशी औषधे उपलब्ध करण्यात आली आहेत. तसेच छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात व्हेंटिलेटर, आॅक्सिजन, इंजेक्शन आणि इतर साहित्य उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. कोरोना  आजार संबंधित अफवा पसरविण्यांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. यासाठी पोलीस अधीक्षक व पोलीस आयुक्त यांच्याशी जिल्हा प्रशासन संपर्कात आहे. अफवा पसरविणाºयांवर गुन्हेदेखील दाखल करण्यात येणार आहेत. सध्या पंढरपूर  येथे अफवा पसरविल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विषाणूशी संपर्क टाळण्यासाठी वापर- पर्सनल प्रोटेक्टिव्ह सूट एक प्रकारचे स्पेशल इक्विपमेंट असते. त्याला परिधान केल्यामुळे जंतूचा संसर्ग टाळता येतो. रुग्णाला डॉक्टरने स्पर्श केल्यानंतर किंवा नकळतपणे सूटशी संपर्क जरी आला तरी विषाणू पसरण्यास मज्जाव करता येतो. साधारणपणे संसर्गजन्य रुग्णांवर उपचार करताना किंवा अशा रुग्णाचे रक्त, स्वॅप (नमुने) घेताना डॉक्टर हा सूट वापरतात. सध्या कोरोना आजार पसरत असल्याने आयसोलेशन व कोरोना व्हायरस वॉर्डमध्ये अशा प्रकारचे सूट वापरण्यात येत आहेत. या सूटमुळे पायापासून डोळ्यापर्यंत सर्व भाग सुरक्षित राहू शकतो. डोळे, चेहरा आणि हातदेखील झाकले जातात.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोनाHealthआरोग्यMedicalवैद्यकीयdocterडॉक्टरhospitalहॉस्पिटल