आॅनलाइन लोकमत सोलापूरपंढरपूर दि ३ : विठ्ठलाला गरिबांचा देव म्हणून संबोधले जाते. मात्र आता त्याच गरिबांना विठ्ठलाचा प्रसाद म्हणून मिळणारा लाडूचा दर मंदिर समितीने अडीच रुपयांनी वाढविला आहे. यामुळे विठ्ठल भक्तांना आता महागलेल्या दरात म्हणजे साडेसात रुपयांना लाडू खरेदी करावा लागत आहे.भाविकांना श्री विठ्ठलाचा प्रसाद म्हणून गावी नेता यावा यासाठी बुंदी लाडू बनविण्याचे आणि त्याची अल्पदरात विक्री करण्याचे काम श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून होत होते. ना नफा ना तोटा या तत्त्वावर आतापर्यंत बुंदी लाडूची निर्मिती करुन त्याची विक्री केली जात होती. बुंदीच्या दोन लाडूंसाठी भाविकांना प्रत्येकी पाच रुपयांप्रमाणे १० रुपये द्यावे लागत. मात्र आता त्यासाठी भाविकांना प्रत्येकी साडेसात रुपयांप्रमाणे दोन लाडूंसाठी १५ रुपये मोजावे लागणार आहेत. लाडू बनविण्याचे काम खासगी संस्थेला देण्यात आले आहे. पूर्वीपेक्षा लाडूचे वजनदेखील वाढविण्यात आले आहे.---------------------लाडूच्या वजनात २० ग्रॅमने वाढ...- मंदिर समितीकडून प्रत्येकी पन्नास ग्रॅम वजनाचे दोन लाडूचे पॅकेट दहा रुपयांना प्रसाद म्हणून दिले जात होते तर आता टेंडरव्दारे नेमलेल्या संस्थेकडून प्रत्येकी सत्तर ग्रॅम वजनाचे लाडू बनविले जात आहेत. त्यामुळे लाडूचे वजनदेखील वाढलेले आहे. आताच्या लाडूमध्ये विलायची तसेच बेदाण्याचादेखील समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे साहजिकच लाडूच्या किमतीमध्ये पाच रुपयांची वाढ झाल्याचे मंदिर समितीकडून सांगितले जात आहे.
पंढरपूरातील विठ्ठल-रुक्मिणीचा प्रसाद अडीच रुपयांनी महागला, पाच रुपयांचा लाडू साडेसात रुपयाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 12:30 PM
विठ्ठलाला गरिबांचा देव म्हणून संबोधले जाते. मात्र आता त्याच गरिबांना विठ्ठलाचा प्रसाद म्हणून मिळणारा लाडूचा दर मंदिर समितीने अडीच रुपयांनी वाढविला आहे.
ठळक मुद्देविठ्ठल भक्तांना आता महागलेल्या दरात म्हणजे साडेसात रुपयांना लाडू खरेदी करावा लागत आहेमंदिर समितीकडून प्रत्येकी पन्नास ग्रॅम वजनाचे दोन लाडूचे पॅकेट दहा रुपयांना प्रसाद म्हणून दिले जात होतेआताच्या लाडूमध्ये विलायची तसेच बेदाण्याचादेखील समावेश करण्यात आलेला आहे