ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शांताराम काशीद, उमेश पाटील, डॉ. रामचंद्र काटमोरे, चेतन काशीद यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने ९ पैकी ६ जागा जिंकत ग्रामपंचायतीवर सत्ता मिळवली. विरोधी पॅनलला तीन जागा मिळाल्या.
दहा वर्षांनंतर पुनः चेतन जयकुमार काशीद यांच्या रूपाने शांताराम काशीद गटाने सत्ता मिळवली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस. आर. चव्हाण यांनी काम पाहिले. गावाच्या विकासासाठी अहोरात्र काम करून विकासकामे करणार असल्याचे सरपंच प्रमिला काशीद यांनी सांगितले. आ. राजेंद्र राऊत यांचे गावावर विशेष लक्ष आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद व शासनाच्या सर्व योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे पॅनल प्रमुख शांताराम काशीद म्हणाले.
यावेळी काशीद गटाचे सदस्य प्रमिला जयकुमार काशीद, शिरीष कुमार कांबळे, संजय शहाजी सुतार, उमेश जिवाजी पाटील, अनुराधा नागनाथ काटमोरे हे सदस्य उपस्थित होते. सुमन अशोक काशीद, सुजाता भास्कर काशीद, बळवंत कल्याण वायकर, आशाबाई अशोक गुरव हे सदस्य गैरहजर राहिले.
फोटो
२६पिंपरी०१
ओळी
पिंपरीच्या सरपंचपदी प्रमिला जयकुमार काशीद यांची, तर उपसरपंचपदी संजय सुतार यांच्या बिनविरोध निवडीनंतर जल्लोष करताना सदस्य व ग्रामस्थ.