सोलापूर : जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागाच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारीपदी प्रसाद मिरकले यांची नियुक्ती झाली आहे. तर याच विभागाची जबाबदारी सांभाळणारे जावेद शेख यांची लातूर येथे बदली झाली आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा परिषदेचे अधिकारी प्रसाद मिरकले हे पदभार घेणार आहेत. शासनाच्या महिला व बाल विकास विभागाने बदलीचा आदेश जारी केला आहे. त्यामध्ये सोलापूर जिल्हा परिषदेतील महिला बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी जावेद शेख यांची लातूर येथे बदली करण्यात आल्याचे नमूद केले आहे. ते सोमवार ३ जुलै रोजी दुपारी लातूर येथे पदभार घेतील.
जावेद शेख हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्याचे आहेत. त्यांना माध्यमिक शिक्षण विभागाचा प्रभारी पदभार देण्यात आला होता. माध्यमिक शिक्षण विभागाचा पदभार ही शेख यांनी चांगला पद्धतीने हाताळला. आता शेख यांची बदली झाल्याने नव्याने माध्यमिक शिक्षणाधिकारी पदासाठी शोध घ्यावा लागणार आहे.