अनगर : भारत कोरोनामुक्त होण्यासाठी अनगरच्या चिमुकल्यांचे अन्नपाणी न घेता अल्लाहला साकडे घातले. अनगरच्या चिमुकल्यांनी उपवास (रोजा) करीत रमजान ईदच्या काळात हा एक छोटासा प्रयत्न केला आहे.
मोहम्मद अली व मोहम्मद वली मुलाणी या सहा वर्षांच्या मुलांनी उपवास केला आहे. अनगर हे सर्वधर्मसमभावासाठी परिचित आहे. अनगरसिद्धाला जेवढे भजले जाते, तेवढेच पाचपिरसाहेबाची मनोभावे पूजाअर्चा केली जाते. मुस्लिम निर्जळी उपवास करतात. असा उपवास केला आहे अनगर येथील इयत्ता पहिलीत शिकणाऱ्या मोहम्मद अली अन्वर मुलाणी आणि मोहम्मद वली मोहसीन मुलाणी या सहा वर्षांच्या बंधूनी. सध्याचे तापमान आणि रखरखत्या उन्हाळ्यात रोजाच्या नियमांनुसार दिवसभर अन्न व पाणी न घेता उपाशीपोटी राहून पहिला रोजा (उपवास) पूर्ण केला व अल्लाहच्या प्रति श्रद्धा व्यक्त केली. भारत देश कोरोनामुक्त होण्यासाठी अल्लाहकडे दुवाच्या माध्यमातून या चिमुकल्यांनी साकडे घातले आहे. हा उपवास करण्यासाठी आजोबा बाबासाहेब गैबी मुलाणी यांची प्रेरणा मिळाली. या चिमुरड्यांनी केलेल्या उपवासाचे माजी आमदार राजन पाटील, लोकनेतेचे चेअरमन बाळराजे पाटील व पंचायत समिती सदस्य अजिंक्यराणा पाटील व अनगर ग्रामस्थांनी त्यांचे काैतुक केले.