तालुक्यात भौगोलिक क्षेत्र १ लाख ६० हजार ८०२ हेक्टर असून लागवडीयोग्य क्षेत्र ९१ हजार ९९३ हेक्टर आहे. यापैकी ७३ हजार ५९६ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते. तालुक्यातील पावसाचे प्रमाण सरासरी ३९१ मिलीमीटर आहे. वेळेत पाऊस पडताच पेरणीसाठी लगबग दिसणार असून यावर्षी प्रामुख्याने बाजरी व मका या पिकांवर शेतकऱ्यांकडून भर दिला जाणार आहे. मात्र यावेळी शेतकऱ्यांनी खरीप पिकांच्या पेरणीसाठी शेतीची नांगरट, खत घालण, फनपाळी अशी पेरणीपूर्व मशागत उरकल्याचे दिसत आहे.
खरिपाची प्रस्तावित आकडेवारी
बाजरी (५ हजार ४६४ हेक्टर), मका (११ हजार १२६ हेक्टर), तूर (२१५ हेक्टर), कांदा (११५० हेक्टर), ऊस (२१ हजार २३५ हेक्टर) अशी ३९ हजार ११९ हेक्टर खरिपासाठी प्रस्तावित नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय चवळी, मूग, मटकीसह जनावरांचा चाऱ्याचे नियोजन केले आहे.
कोट :::::::::::::::::
यावर्षी पाण्याची पातळी गतवर्षीपेक्षा चांगली आहे. पावसाने सुरुवात केल्यामुळे खरीप हंगाम लाभदायी ठरेल. याआनुषंगाने तालुक्यात पुरेशा बियाण्याची योग्य उपलब्धता केली आहे. पिकासंदर्भात ऑनलाइन शेती शाळांचे आयोजन करण्यात येणार आहे.
- गजानन ननावरे
तालुका कृषी अधिकारी
कोट :::::::::::::::::::::
कोरोना महामारी व नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना खरीप बियाण्यासाठी थेट अनुदान द्यावे, बँकांना कर्जपुरवठा करण्याचे आदेश द्यावेत. खरीप पिकांशी निगडीत सुविधांबाबत सरकारने विशेष लक्ष द्यावे. खरीप हंगाम वाया गेला, तर भविष्यात अन्नधान्य टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.
- बाळासाहेब सरगर
जिल्हाध्यक्ष, भाजप किसान मोर्चा