दोन दिवसांपासून हवामानात अचानक बदल होत अवकाळी पावसाची बळीराजाकडे वक्रदृष्टी फिरवली आहे. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे चाऱ्याच्या पिकांची विल्हेवाट लागणार असून वादळी वारे, विजा व गारपीट यामुळे संभाव्य नुकसानीची धास्ती तालुक्यातील शेतकऱ्यांनी घेतली आहे. यामध्ये झाडांची पडझड व द्राक्ष, केळी यासह सध्या प्रमुख पिक असलेल्या आंबा बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. अद्याप नुकसान झाले नसले तरी काही महत्त्वाच्या फळबागा अवकाळीच्या रडारवर असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
कोट :::::::::::::::::
सध्या अवकाळी पावसाचा जोर वाढला असून सध्या तालुक्यात थोड्या प्रमाणात सुरुवात झाली आहे. मात्र मोठ्या पावसाचा तडाखा बसला तर आंबा, द्राक्षासह शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे.
- दीपक गोरड
शेतकरी, गोरडवाडी
फोटो : माणकी (ता. माळशिरस) येथील गुलाब निंबाळकर यांच्या बागेतील नारळाच्या झाडावर विज पडून आग लागल्याचे दिसत आहे.