शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

लोकसभेच्या निवडणुकीची तयारी ; छायाचित्र नसेल तर मतदार यादीतून नाव वगळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 11:48 AM

निवडणूक आयोगाने लोकसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यात १ जानेवारी २०१८ पूर्वी मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला.

ठळक मुद्देनिवडणूक आयोगाने लोकसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू मतदारांचे फोटो गोळा करण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली मतदारांच्या याद्या तहसील कार्यालयांकडे उपलब्ध

सोलापूर : मतदार यादीत मतदारांचे रंगीत छायाचित्र असणे आवश्यक आहे. मतदारांचे फोटो गोळा करण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. परंतु, ज्यांचे छायाचित्र मतदार यादीत नसेल त्यांचे नाव वगळण्यात येणार असल्याचे प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी सांगितले. 

निवडणूक आयोगाने लोकसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यात १ जानेवारी २०१८ पूर्वी मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. १० जानेवारी रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. जिल्ह्यात १६ लाख ९८ हजार ६३३ पुरुष तर १५ लाख ३१ हजार ४११ महिला मतदार आहेत. ५३ तृतीयपंथी मतदारांचाही समावेश आहे.

२०१८ च्या जनगणनेनुसार १८ वर्षांवरील लोकसंख्या व प्रत्यक्ष मतदार नोंदणीमध्ये तफावत आहे. त्यामुळे मतदार यादीत मयत, स्थलांतरित व दुबार मतदार नोंदणीची मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत पडताळणी सुरू आहे. मयत, स्थलांतरित व दुबार मतदार वगळण्याचे काम सुरू आहे. मतदार यादीत महिलांची नोंदणी वाढविण्याचे काम सुरू आहे. 

५ लाख मतदारांकडे कृष्ण-धवल ओळखपत्र- सोलापूर जिल्ह्यात रंगीत फोटो असलेल्या मतदारसंख्या १ लाख ४७ हजार ४० एवढी आहे. कृष्ण-धवल मतदारसंख्या असलेल्या मतदारांची संख्या ५ लाख ४५ हजार ३९ इतकी आहे. या मतदारांच्या याद्या तहसील कार्यालयांकडे उपलब्ध आहेत. त्याशिवाय ७३३९ मतदारांचे मतदार यादीत छायाचित्र अथवा ओळखपत्र नसल्याचे लक्षात आले आहे. कृष्ण-धवलच्या जागी रंगीत छायाचित्र जोडण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने यासाठी जिल्ह्यात एकूण ३२९० मतदान केंद्रस्तरीय अधिकाºयांनी नियुक्ती केल्याचेही शिंदे यांनी सांगितले. 

रंगीत फोटो देऊन सहकार्य करा- मतदारांना रंगीत ओळखपत्र दिले जात आहे. ज्या मतदाराकडे पूर्वीचे १६ अंकी क्रमांकाचे कृष्ण-धवल व रंगीत मतदार ओळखपत्र आहे त्या मतदारांचे फोटो गोळा करून त्यांना नवीन १६ अंकी ओळखपत्र देण्यात येणार आहे. ज्यांच्याकडे आजही कृष्ण-धवल ओळखपत्र आहे, अशा मतदारांनी आपले लगतच्या कालावधीत काढलेले फोटो संबंधित तहसील कार्यालय अथवा मतदार यादी भागातील मतदान केंद्रस्तरीय अधिकाºयांकडे द्यावे, असे आवाहन शिंदे यांनी केले आहे. 

टॅग्स :Solapurसोलापूरlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय