शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
2
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
3
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
4
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
5
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
6
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
7
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
8
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
9
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
10
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
11
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
12
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
13
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
14
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
15
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
16
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
17
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
18
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
19
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
20
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा

विठ्ठल मंदिराचा जिर्णोद्धार करताना शिलालेखांचे संवर्धन करा, इतिहास प्रेमींची मागणी

By संताजी शिंदे | Published: May 28, 2024 2:34 PM

सोलापूर : पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शना नुसार पंढरपूरातील विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समिती मंदिराचा जिर्णोद्धार जलद गतीने करत आहे. त्यामुळे मंदिरास ...

सोलापूर : पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शना नुसार पंढरपूरातील विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समिती मंदिराचा जिर्णोद्धार जलद गतीने करत आहे. त्यामुळे मंदिरास मूळ स्वरूप प्राप्त होणार आहे. ही घटना महत्वपूर्ण आहे, मात्र जीर्णोद्धार करताना मंदिरातील शिलालेखांचे योग्य जतन व संवर्धन व्हावे अशी मागणी, सोलापूरच्या इतिहास प्रेमी मंडळींनी केली आहे.

      विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पंधरा शिलालेख आहेत. इतिहासाचार्य वि.का. राजवाडे, डॉ.शोभना गोखले, आनंद कुंभार, तुळपुळे, वा.ल. मंजुळ यांनी अथक परिश्रम करून शिलालेखाचे वाचन केले आहे. ते शिलालेख मंदिराच्या भिंतीवर व स्तंभावर आहेत. त्यास कोणतेही इजा पोहचूनये याची दक्षता घेतली जावी. शिलालेख अत्यंत महत्त्वाचे असून, इतिहास संशोधनाच्या संदर्भासाठी त्याचा उपयोग होतो. शिलालेखाची काळजी घेणे आवश्यक आहे, असे मत इतिहास प्रेमी मंडळींनी व्यक्त केले.      विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समितीने समाज उपयोगी उपक्रम राबविले आहेत, त्यामुळे प्रबोधन चळवळीला गती मिळाली आहे. समितीने एखादे वस्तू संग्रहालय मंदिर परिसरात उभारावे, अशी देखील मागणी इतिहास प्रेमी मंडळाचे अध्यक्ष प्रा.एम.एम. मस्के यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीस प्रा.नामदेवराव गरड, प्राचार्य. डॉ. राजेंद्रसिंह लोखंडे, प्राचार्य एम.ए. शेख, डॉ. नभा काकडे, इतिहास अभ्यासक नितीन अनवेकर, इतिहास ग्रंथ लेखक डॉ. सत्यव्रत नुलकर, डॉ.दशरथ रसाळ, प्रा.संतोष मारकवाड यांनी दुजोरा दिला आहे.

टॅग्स :Pandharpurपंढरपूर