शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

भाजपाचे शहराध्यक्ष अशोक निंबर्गी यांचा शहराध्यक्षपदाला रामराम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 2:34 PM

मुदत संपल्याचे कारण;  प्रदेश कार्यकारिणीने स्वीकारला नाही अद्याप राजीनामा

ठळक मुद्देभाजपच्या शहराध्यक्षपदी भाजपचे पूर्व भागातील नेते पांडुरंग दिड्डी यांची निवड व्हावी यासाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख प्रयत्नशील विधानसभा निवडणूक तोंडावर आहे, त्यापूर्वीच प्रा. निंबर्गी यांनी राजीनामा दिल्याने सहकारमंत्री गटात खळबळ शहरात पालकमंत्री विरुद्ध सहकारमंत्री असा थेट वाद सुरू झाला

राकेश कदम

सोलापूर : मुदत संपल्याचे कारण देऊन भाजपचे शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. परंतु, शहरातील गटबाजीला कंटाळूनच निंबर्गी यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. प्रदेश कार्यकारिणीने अद्याप त्यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही. जानेवारी २०१६ मध्ये प्रा. अशोक निंबर्गी यांची शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. त्यापूर्वी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्याकडे शहराध्यक्षपद तर प्रा. निंबर्गी यांच्याकडे सरचिटणीसपद होते.  

देशमुखांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश झाला. त्यांची शहराध्यक्षपदाची मुदत संपली. या काळात पालकमंत्री देशमुख आणि प्रा. अशोक निंबर्गी एकदिलाने काम करीत होते. यादरम्यान काही विषयांवर दोघांमध्ये धुसफूस सुरू झाली. प्रा. निंबर्गी यांनी पालकमंत्री देशमुख यांची साथ सोडून सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याशी दिलजमाई केली. सहकारमंत्री देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी शहरात नवी आघाडी तयार केली. या आघाडीच्या साहाय्याने प्रा. अशोक निंबर्गी यांची भाजपच्या शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली. 

यानंतर मात्र शहरात पालकमंत्री विरुद्ध सहकारमंत्री असा थेट वाद सुरू झाला. महापालिका असो वा परवा झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत शहराध्यक्षांना डावलून शहर उत्तर मतदारसंघात भाजपचे अनेक कार्यक्रम झाले. त्याबद्दल तक्रारी करण्यात आल्या होत्या. लोकसभा निवडणुकीत भाजपला यश मिळाले. निवडणूक निकालाला एक महिना होत नाही तोच प्रा. अशोक निंबर्गी यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. त्यापूर्वीच प्रा. निंबर्गी यांनी राजीनामा दिल्याने सहकारमंत्री गटात खळबळ उडाली आहे. या पदासाठी पालकमंत्री गटाने फिल्डिंग लावली आहे.

पांडुरंग दिड्डी यांच्यासाठी पालकमंत्र्यांचे प्रयत्न- भाजपच्या शहराध्यक्षपदी भाजपचे पूर्व भागातील नेते पांडुरंग दिड्डी यांची निवड व्हावी, यासाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख प्रयत्नशील असल्याची चर्चा महापालिकेत आहे. पद्मशाली समाजातील नगरसेवकांनी आठ दिवसांपूर्वी मार्कंडेय मंदिरात एक बैठक घेतली होती. या बैठकीत भाजपचे नेते आपल्यावर अन्याय करीत आहेत. समाजातील नेत्यांना कोणतेही मानाचे पद दिले जात नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षातील नेत्यांना इंगा दाखविण्याचा इशारा देण्यात आला होता. नगरसेवकांचे हे बंड थंड करण्यासाठी पालकमंत्री देशमुख यांनी पांडुरंग दिड्डी यांना मध्यस्थी करण्याचा आग्रह धरल्याची चर्चा होती. दिड्डी यांनी महापालिकेत विरोधी पक्षनेते म्हणूनही काम पाहिले आहे. 

प्रदेश कार्यकारिणी लवकरच घेणार निर्णयसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रा. अशोक निंबर्गी यांनी दहा जून रोजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. दानवे यांनी राजीनामा स्वीकारलेला नाही. मात्र यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

खुद के पिछे हटने से... : प्रा. निंबर्गी यांची भावनिक पोस्ट - राजीनाम्याच्या वृत्ताबाबत प्रा. अशोक निंबर्गी यांना विचारले असता त्यांनी प्रथम इन्कार  केला. त्यानंतर मात्र त्यांनी व्हॉट्सअ‍ॅपवर एक भावनिक पोस्ट केली. ‘खुद के पिछे हटने से अगर सभी का भला होता हो तो हट जाने में कोई बुराई नही है’....घराचा प्रमुख होणे सोपे नाही. त्याची स्थिती पत्र्याच्या शेडसारखी असते. सर्व नैसर्गिक आपत्ती झेलतो.. परंतु, त्याखाली राहणारे नेहमी म्हणतात की.. हा खूप आवाज करतो...

टॅग्स :SolapurसोलापूरBJPभाजपाPoliticsराजकारणVijaykumar Deshmukhविजयकुमार देशमुखvidhan sabhaविधानसभा