सोलापूर : मुस्लिम समाजातील व्यक्तींवर सातत्याने होणारे हल्ले त्वरीत रोखावे यासाठी मुस्लिम कृती समितीतर्फे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात अनेक तरूण हातात विविध मागण्यांचे फलक घेऊन आले होते़ गेल्या पाच वर्षात देशभरात अशा माणसांच्या घटनात वाढ झाली आहे़ या हिंसामध्ये बळी पडलेल्यांना त्यांच्या कुटुंबियांना एक कोटीची मदत देण्यात यावी, मोसीन शेख हत्याप्रकरणात सरकारी वकीलाची नियुक्ती करण्यात यावी, त्याच्या कुटुंबियांना ५० लाखांची आर्थिक मदत करावी, झुंडशाही प्रवृत्तीला समर्थन देणाºया राजकीय पक्षांची मान्यता रद्द करावी यासह आदी मागण्यांसाठी मुस्लिम समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश केला़ या आंदोलनात सोलापूर शहर व जिल्ह्यातील मुस्लिम बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.