सध्या दुधाला १७ रुपये प्रतिलिटर दर असताना भुसा गोणी ११००, तर सरकीपेंड १८०० रुपये आहे. गतवर्षी लॉकडाऊनमुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला असताना सरकार कडून शेतकऱ्यांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली मात्र सरकारने दूध उत्पादकांना काहीही न देता दूध धंद्यावर पूरक उद्योग करणाऱ्या कंपन्यांना सवलतीची खिरापत वाटली.
यावेळी १५ दिवस संकलन केंद्रात दूध घातल्यानंतर शेतकऱ्यांच्या हातात एक रुपयाही राहत नाही. पशुखाद्याची उधारी सुद्धा फिटत नाही. दूध संकलन संस्थांचे कर्ज दूध उत्पादक शेतक-यांच्या डोक्यावर वाढत चालले आहे. सरकारने दूध उत्पादकांच्या समस्याकडे डोळेझाक न करता प्रतिलिटर दहा रुपये अनुदान देण्यात यावे, अशी मागणी रयतक्रांती शेतकरी संघटनेचे अजय बागल यांनी केली आहे.
चौकट घेणे..
दुधाचा भाव प्रतिलिटर १७ रुपये
कोरोनाच्या कडक निर्बंधामुळे दुग्धजन्य पदार्थ विक्रीची दुकाने,वेगवेगळे कार्यक्रम, समारंभ बंद आहेत. त्यामुळे संकलित केलेल्या दुधाला मागणी कमी असल्याने दरही कमी झाले आहेत. ३.५ ची कॅट व ८.५ एसएनएफला २१ रुपये प्रति लिटर दर असला तरी एवढी कॅट व डिग्री मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या हातात प्रत्यक्ष १७ रुपयेच दर मिळत आहे, अशी व्यथा दूध उत्पादकांमधून व्यक्त होऊ लागली आहे.
----
पशुखाद्याचे दर पाहता सध्या दूध व्यवसाय तोट्यात आहे. जनावरांना खुराक पदरमोड करून घालावा लागत आहे. दूध उत्पादक शेतकरी जगविण्यासाठी सरकारने थेट शेतकऱ्यांच्या बँकखात्यात दहा रुपये प्रतिलिटर अनुदान जमा करायला हवे.
- कैलास पवार, दूध उत्पादक
----