सोमवारी उडीद ३०० बॅग, तर मूग २०० बॅग आवक झाली. कर्देहळळीचे शेतकरी प्रकाश पवार यांचा उडीद सर्वाधिक ८ हजार ११२ रुपये प्रति क्विंटलने विकला. यंदा उडीद व मुगाला चांगला दर राहील असे आडते सोमनाथ माळी यांनी सांगितले. हा सोलापूरसह जवळपासच्या बाजार समितीत मिळालेला उच्चांकी दर आहे. अक्कलकोट तालुक्यातील दुधनी बाजार समितीत उडदाला ७ हजार ६५० रुपये इतका दर मिळाला होता.
सोमवारी सोलापूर बाजार समितीत उडीद कमीतकमी ७ हजार २०० रुपये, तर सर्वाधिक ८१०० प्रति क्विंटल, मुग ५ हजार ८४५ ते ६,४३५ रुपये प्रति क्विंटल दराने, हरभरा ४ हजार ५०० ते ४ हजार ८०० रुपयाने विक्री झाला. उडदाला हमी भाव ६, ३०० रुपये, मूग ७, २७५ रुपये, तर हरभऱ्याला ५ हजार १०० रुपये आहे.
----