विष्णू शिंदे
लांबोटी : शेतात कष्टाने पिकविलेला लालबुंद टोमॅटो बाजारपेठेत जाण्यासाठी तयार झाला अन् लॉकडाऊनमुळे भाव गडगडला. ‘मिळकत कमी, हमाली जास्तीची’ झाल्याने अर्जुनसोंड (ता़ मोहोळ) येथील एका शेतकºयाने टोमॅटो मुळासकट उपसून जनावरांपुढे टाकला. ही व्यथा आहे अर्जुनसोंड येथील मुकुंद ढेरे या शेतकºयाची़ त्यांनी एक एकर टोमॅटो लावला. त्याची रात्रंदिवस निगा राखत खतपाणी अन् फवारणी करून जोपासना केली. याच काळात कोरोना विषाणूच्या संकटाने शेतकºयाचे कंबरडे मोडले़ याच काळात एकीकडे जनावरांच्या दुधाला भाव नाही़ तर दुसरीकडे खुराकाचे भाव गगनाला भिडले. भाजीपाला, कलिंगड, टरबूज, टोमॅटो यांना बाजारात किंमत मिळत नसल्याने शेतकरी अधिक चिंतातुर झाला आहे.
पैसे नसतानाही प्रसंगी पेरणी व लागवड करताना अतोनात कष्ट केले. बाजारात भाव येणार म्हणून शेतकरी आनंदी झाला अन् लॉकडाऊन करण्यात आले़ परिणामत: शेतातील पिकांचे होत्याचे नव्हते झाले. शेतातील टोमॅटो तोडणीसाठी प्रत्येक महिलेस दोनशे पन्नास रुपये मजुरी, वाहतूक खर्च द्यावा लागतोय़ केवळ साठ रुपये पण व्यापाºयांच्या हाती पडत नाहीत़ अशा स्थितीत ढेरे यांनी बाजारात विक्रीसाठी घेऊन गेलेल्या टोमॅटोचे भाव गडगडले़ मागणी नसल्याने सुमारे ४० कॅरेट टोमॅटो तसाच शेतात आणून जनावरांपुढे खायला ओतल्याची व्यथा मुकुंद ढेरे या शेतकºयाने व्यक्त केली.
गावोगावी शेतीत राबराबणाºया शेतकºयांच्या नशिबी हीच तºहा आहे. कधी एकदा हा कोरोना जातो. सर्व पूर्वपदावर येईल, अशी चर्चा शेतकºयांमधून होत आहे.
शेतात झाला लाल चिखल- काय सांगावं या कोरोनाच्या फटक्यामुळे ९० टक्के तयार झालेला माल दुसºया दिवशी मुळासकट उपटून जनावरांना चारा म्हणून साखर कारखान्यावरील राजस्थानी गिर गायींना दिला. बाजार समितीत मागणी मंदावली़ व्यापारी टोमॅटो आहे म्हटले की प्रतिसादही मिळत नाही़ कष्टाने पिकवले आणि उत्पन्न हाताला येणार असे वाटत असताना लॉकडाऊनमुळे शेतातच लाल चिखल झाला अशी व्यथा ढेरे यांनी मांडली़