बाशी : देशासाठी लढत असलेल्या सैनिकांच्या पत्नीचा गौरव होत आहे, ही अभिमानास्पद गोष्ट आहे. सोलापूर जिल्ह्यात ६ हजार ७८० सेवानिवृत्त सैनिक असून ८ हजार सैन्यामध्ये कार्यरत आहेत. सैनिकांच्या पत्नींचा सन्मान झालाच पाहिजे, असे मत जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामी यांनी स्पष्ट केले.
शहरातील लायन्स क्लब रॉयल व मैत्रिण ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताकदिनी सैन्यामध्ये सेवेत असलेल्या सैनिकांच्या पत्नींचा शूरशक्ती सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी स्वामी बोलत होते. व्यासपीठावर करुणा स्वामी, उर्मिला गिरीगोसावी, सेल टॅक्स कमिशनर प्रदीपकुमार आगरे, लायन्स क्लब बार्शी रॉयलच्या अध्यक्षा सीमा काळे, मैत्रीण ग्रुपच्या अध्यक्षा अपर्णा शिराळ उपस्थित होते.
स्वामी म्हणाले की, देशसेवा करीत असताना त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी त्या पत्नीवर असते. सैनिकांच्या पत्नीची हिंमत, मनोधैर्य वाढवणे आपले कर्तव्य आहे. सैनिक वर्षातून दहा दिवस रजेवर येतात. पण त्यांना शासकीय कामे आटोपण्यात ७५ टक्के वेळ जातो. कुटुंबासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे एक दिवस सैनिकांसाठी कार्यक्रम राबविणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमासाठी मृणाल तोडकर, अस्मिता माळी, प्रतीक्षा काळदाते, श्वेता वळसंगे, सुजाता मुथा, शमा मठपती यांनी परिश्रम घेतले. यावेळी सविता गोडगे, अर्चना बिचितकर यांनी सैनिक पत्नींना येणाऱ्या अडचणी सांगितल्या. आभार सचिवा सुजाता मुथा यांनी मानले.
लता पांडुरंग गोंदील, रुपाली उमेश मोरे, पूनम किरण लंगोटे, वनिता अण्णासाहेब ननवरे, मनकर्णिका दत्तात्रय मोरे, शीला मोरे, मीरा गायकवाड ,पार्वती चंद्रकांत जगदाळे, दीपाली गणेश कानगुडे, सोनम मोरे, संगीता यादव, नीता शिंदे, सुप्रिया मोरे ,सविता गोडगे, सरोजिनी चव्हाण, सुवर्णा कदम, रंजना मुळे, दीपाली शिंगन, सुरेखा गायकवाड, सुरेखा हांडे, अनिता ठोंगे, सुनीता मगर, भाग्यश्री साळुंखे, प्रांजली काशीद, उषा कुदळे या आजी-माजी सैनिक पत्नींचा शूरशक्ती म्हणून गौरव करण्यात आला.
३०बार्शी-सैनिक पत्नी
---------