PM Narendra Modi ( Marathi News ) : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर दौऱ्यावर आले आहेत. कुंभारी येथील रे नगरमधील १५ हजार कामगारांच्या घरांचे वाटप आज झाले. या पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यासपीठावर बोलत असताना लहानपणाची आठवण काढत भावूक झाले. यावेळी पीएम मोदींनी भाषणाला सुरुवात करताना विठ्ठलाला आणि सिद्धेश्वराला नमन करुन केली. तसेच २२ जानेवारीला रामललांची प्राणप्रतिष्ठा होणार असे म्हणताच उपस्थित जनसमुदायाने ‘जय श्रीराम जय श्रीराम’ अशा घोषणा दिल्या.
यावेळी बोलताना पीएम मोदी म्हणाले, आपण २२ जानेवारीला रामज्योती प्रज्ज्वलित केल्या तर गरीबी नष्ट करण्याची प्रेरणा मिळेल. महाराष्ट्रात एक लाखाहून गरीब कुटुंब ही आपल्या पक्क्या घरांमध्ये रामज्योती प्रज्वलित करतील याचा मला विश्वास आहे, असंही मोदी म्हणाले. यावेळी मोदींनी राज्यातील विकास कामांची माहिती दिली आणि राज्याली जनतेला शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, सर्व सामान्य कष्टकरी लोकांना घर किती महत्वाचे असते याची जाणीव मला आहे. आज जे घर तुम्हाला मिळत आहे, ते पाहून मला असे वाटते की कदाचीत मीही लहानपणी अशा घरात राहिलो असतो तर असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भावूक झाले आणि त्यांचा बोलताना अचानक आवाज बदलला अन त्यांच्या डोळ्यात आश्रू तरळले.
"२२ जानेवारी रोजी आयोध्यामध्ये प्रभू श्री रामांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना होत आहे. त्या दिवशी गरीबांचा अंधकार दूर होईल. तुमच जीवन आनंदाने भरू जावो अशी सदिच्छा दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या भाषणाने उपस्थित लोकही भावनीक झाले होते.