शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, विरारमध्ये मोठा राडा; भाजपा म्हणते, ही तर स्टंटबाजी
2
"मला भाजपवाल्यांनीच सांगितले की ते..."; विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपांवर ठाकुरांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
4
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
5
स्पेस स्टेशनमध्ये सुनीता विल्यम्सची तब्येत बिघडली, वजन कमी होत आहे? स्वत: दिली माहिती
6
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या हंगामादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी, पटापट चेक करा आजचे नवे दर
7
उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकीत या जागांवर एनडीए तर या मतदारसंघात इंडियाचं पारडं जड
8
मतदारांना लागणार चंदनाचा टिळा अन् मिळणार तुळशीचे रोप; पनवेल ठरणार लोकशाहीच्या उत्सवाचे मॉडेल
9
"महाविकास आघाडीचा खोटं बोलून सत्तेत यायचा प्रयत्न"; धनंजय मुंडेंचं टीकास्त्र
10
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
11
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
12
Naga chaitanya-Sobhita wedding: शोभिता नेसणार कांजीवरम साडी पण...; काय आहे खास?
13
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
14
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
15
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
16
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
17
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
18
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
19
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
20
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सोलापूर दाैरा; जाणून घ्या कोणते रस्ते बंद? पर्यायी मार्ग काय?

By appasaheb.patil | Published: January 18, 2024 2:01 PM

असे जाता येईल कार्यक्रमस्थळी

आप्पासाहेब पाटील, सोलापूर: पंतप्रधाननरेंद्र मोदी हे शुक्रवार १९ जानेवारी २०२४ रोजी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. मोदी हे रे नगर कुंभारी येथील पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत असंघटीत कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या घरकुल योजनेचा लोकार्पण सोहळा करणार आहेत. त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिने कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता सोलापूर ते हैद्राबाद रोडवरील दोड़डी फाटा ते कुंभारी जाणारा रस्ता राज्यमार्ग क्रमांक २०५ हा शुक्रवारी दिवसभर अत्यावश्यक सेवेची वाहने वगळून इतर वाहनांच्या वाहतूकीसाठी बंद करण्याचा निर्णय सोलापूर पोलिस दलाच्या वाहतूक शाखेने घेतला आहे. दरम्यान, वाहतूक बंद केल्याने पोलिसांनी पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिला आहे.

याबाबत पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी आदेश पारित केला आहे. दरम्यान, पंतप्रधान यांचा दौरा होणार असल्याने दोडडी फाटा - दोडडी चौक- रे नगर- कुंभारी या दरम्यान पथक्रमण करण्यास मनाई करण्यात येत आहे. तर कुंभारी - रे नगर - दोडडी चौक, दोडडी फाटा या दरम्यान पथक्रमण करण्यास मनाई करण्यात येत आहे. या मार्गावरील वाहने तांदुळवाडी - मुस्ती - धोत्री, वडगाव, दिंडूर, वळसंग या मार्गे पथक्रमण करतील. शिवाय वळसंग - दिंडूर - वडगाव धोत्री मुस्ती तांदुळवाडी या मार्गे पथक्रमण करतील. हा आदेश पोलीस, रूग्णसेवा, अग्निशमन दलाची वाहने, अत्यावश्यक सेवेतील वाहने व परवानगी दिलेल्या वाहनांना लागू राहणार नाही असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

असे जाता येईल कार्यक्रमस्थळी

या मार्गे जाता येणार कार्यक्रमास सोलापूर ते अक्कलकोट रोडवरील बंदपट्टे विटभट्टी ते रे नगर रस्ता, आण्णा मोटार्स ते रे नगर जाणारा रस्ता, टोल नाका ते रे नगर जाणारा रस्ता या ठिकाणाहून वाहन पार्किंग ठिकाणी नागरिकांना पोहचता येणार आहे. शिवाय सोलापूर हैद्राबाद रोडवरील मुळेगांव, दोड्डी फाटा, दोड्डी चौक, धोत्रीमार्गे वाहने पार्किंग ठिकाणी पार्किंग करून सभास्थळी पोहोचता येणार आहे. त्याचप्रमाणे व्हीव्हीआयपीच्या सुरक्षेच्या कारणास्तव दोड्डी फाटा ते कुंभारी रस्ता १९ जानेवारी रोजी बंद ठेवण्यात येणार आहे. कुंभारी ते दोड्डी फाटा रस्ता प्राथमिक आरोग्य केंद्रापासून पुढे सर्व नागरिकांसाठी बंद करण्यात येणार आहे अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक सायकर यांनी दिली.

टॅग्स :prime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीSolapurसोलापूर