पंतप्रधानांचा वाढदिवस बेरोजगार दिवस म्हणून साजरा; सोलापुरात काँग्रेसचे अनोखे आंदोलन

By Appasaheb.patil | Published: September 17, 2022 02:29 PM2022-09-17T14:29:02+5:302022-09-17T14:29:08+5:30

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

Prime Minister's birthday celebrated as Jobless Day; Unique movement of Congress in Solapur | पंतप्रधानांचा वाढदिवस बेरोजगार दिवस म्हणून साजरा; सोलापुरात काँग्रेसचे अनोखे आंदोलन

पंतप्रधानांचा वाढदिवस बेरोजगार दिवस म्हणून साजरा; सोलापुरात काँग्रेसचे अनोखे आंदोलन

Next

सोलापूरसोलापूर शहर मध्य विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने शहर अध्यक्ष गणेश डोंगरे, व शहर मध्य युवक कॉंग्रेस अध्यक्ष वाहिद बिजापुरे यांच्या नेतृत्वाखाली चुकीचे धोरणे राबवून युवकांना बेरोजगार करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस बेरोजगार युवकांच्या वतीने गेंट्याल चौक येथे हातगाडीवर पकोडे तळून चहा विकून बेरोजगार दिन साजरा करण्यात आला. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना रोजगाराभिमुख धोरणे राबविण्याची सुबुद्धी द्यावी असे म्हणून त्यांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना सोलापूर युवक कॉंग्रेस शहर अध्यक्ष गणेश डोंगरे म्हणाले की, गेल्या आठ वर्षांपूर्वी वर्षाला २ कोटी रोजगार देतो म्हणून खोटे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या मोदी सरकारमुळे गेल्या पंचेचाळीस वर्षातील बेरोजगारीचा रेकॉर्ड मोडला आहे. तसेच महाराष्ट्रातील अनेक उद्योग गुजरात ला पळवित आहेत. म्हणून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस बेरोजगार दिन म्हणून साजरा केला आहे.

दरम्यान, यावेळी शिंदे, फडणवीस खोके सरकारच्या नाकर्तेपणामुळे वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प नरेंद्र मोदींनी गुजरात ला पळविला याचा निषेध करण्यात आला. या कार्यक्रमास परिवहन समिती सदस्य तिरुपती परकीपंडला, उत्तर युवक कॉंग्रेस उपाध्यक्ष शरद गुमटे, सलमान शेख, शब्बीर फुलमामडी, आफताब बिजापुरे, रईस मकानदार, बुगप्पा म्हेत्रे, रफिक चकोले, अल्ताफ बिजापुरे, राजू आंबेवाले, करीम मकानदार, लक्ष्मण बाडीवाले, शहबाज बेपारी यांच्यासह इतर बेरोजगार युवक सहभागी झाले होते. 

Web Title: Prime Minister's birthday celebrated as Jobless Day; Unique movement of Congress in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.