टेंभुर्णी : येथील कुर्डूवाडी-टेंभुर्णी रोडवरील दूध संघाच्या शेजारी उमेश रामदास पोळ याच्या मालकीच्या खोलीत सुरू असलेल्या अड्ड्यावर मन्ना नावाचा जुगार खेळताना २० जणांना रंगेहाथ पकडले़ यावेळी ४ लाख ८६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला़
करमाळा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत स्वामी यांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली आहे. याबाबतची फिर्याद पोकॉ. प्रवीण रमेश साठे यांनी दिली आहे़ याप्रकरणी बाळू किरण डोके (रा. कंदर, ता. करमाळा), सिकंदर मेहबूब आत्तार (रा. टेंभुर्णी), शेख माजिद अब्दुलकरीम (रा. अरब गल्ली, उस्मानाबाद सध्या सुर्ली रोड, टेंभुर्णी), जयवंत दत्तात्रय पोळ (रा. महादेव गल्ली, टेंभुर्णी), महेश मच्छिंद्र जाधव (रा. वेणेगाव), योगेश किसन पाटील (रा. टेंभुर्णी), समाधान वासुदेव खटके (रा. तांबवे), भाऊ मधुकर शिंदे (रा. निमगाव), बंडू सुग्रीव खटके, बापू भागवत कुटे (रा. वेणेगाव), उमेश रामदास पोळ (रा. ढोर गल्ली, टेंभुर्णी), गौतम अजित भोसले (रा. वेणेगाव), समाधान पांडुरंग गोडसे (रांझणी), गुड्डू इस्माईल तांबोळी (रा. टेंभुर्णी), तानाजी दत्तात्रय गायकवाड (रा. भीमानगर), नवनाथ भाऊराव पाटील (रा. टेंभुर्णी), अनंता सिद्धाराम पोळ (रा. टेंभुर्णी), संजय रंगनाथ पटणे (रा. टेंभुर्णी), दादा सोपान गलांडे (रा. कालठण) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. या कारवाईमुळे टेंभुर्णी परिसरातील अवैध धंदे वाल्यांना चांगलाच चाप बसणार आहे़
२१ मोबाईल जप्त...- या कारवाईत पोलिसांना ४ लाख ८६ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल मिळाला असून, रोख रक्कम २२ हजार ८०० रुपये, वेगवेगळ्या कंपनीचे २१ मोबाईल, वेगवेगळ्या कंपनीच्या १२ मोटरसायकली, जुगार साहित्य जप्त केले आहे.