आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २४ : पंढरपुरातील धोकादायक इमारती, मठ आदींना वारंवार नोटिसा देऊनही त्या हटविण्यात आलेल्या नाहीत. कार्तिकी एकादशीच्या तोंडावर या इमारती तत्काळ पाडून टाका, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी पंढरपूर नगरपालिका मुख्याधिकाºयांना सोमवारी दिले. यात्रा काळात स्वच्छता महत्त्वाची आहे. त्याला प्राधान्य देऊन नियोजन करा, असेही त्यांनी सांगितले. पंढरपुरात ३१ आॅक्टोबर रोजी कार्तिक एकादशीचा सोहळा होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठक झाली. निवासी उपजिल्हाधिकारी अजित रेळेकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी डॉ. विजय देशमुख, जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमंत पाटोळे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, कार्तिक वारीत पंढरपुरात वारकरी-भाविक मोठ्या प्रमाणात येतात. यासाठी पंढरपुरात वारीपूर्वी आणि वारीनंतर करावयाच्या स्वच्छतेचे नियोजन करणे महत्त्वाचे आहे. येणाºया वारकरी-भाविकांना समाधान वाटावे अशा प्रकारे स्वच्छतेचे नियोजन करावे. यामध्ये स्वयंसेवी संस्था, शाळा-महाविद्यालयांचाही सहभाग घ्यावा, असेही त्यांनी सांगितले. ------------------ पंढरपूर शहरात सुरु असलेली रस्त्यांची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याबरोबरच रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम तत्काळ करावे. महावितरणने कार्तिक वारी कालावधीत शहरात व ६५ एकर येथे अखंडित वीज पुरवठा सुरळीत राहील याबाबत दक्षता घ्यावी. - अन्न व औषध प्रशासन विभागाने फेरीवाले, हॉटेल यांच्याकडील अन्न पदार्थांची तपासणी करावी. यासाठी पथके कार्यान्वित करावीत. पंढरपूर नगरपरिषदेने वारी कालावधीत शहरातील धोकादायक इमारतींमध्ये वारकरी-भाविक वास्तव्यास राहणार नाहीत याबाबत खबरदारी घेऊन शहरातील मोकाट जनावरांचा वेळीच बंदोबस्त करावा. - गर्दीच्या मार्गावरील सर्व अतिक्रमणे हटविण्याबाबतही नगरपालिकेने कारवाई करावी. मंदिर समितीने दर्शन मंडप, स्काय वॉक, पत्राशेड, दर्शन रांगेत वारकºयांना देण्यात येणाºया सुविधा याबाबत नियोजन करावे. -------------------- महाराष्ट्र एस.टी. महामंडळाने आवश्यक जादा एस.टी. बसचे नियोजन करावे. - वारी कालावधीत अवैध प्रवासी वाहतुकीस आळा घालण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने संबंधितांना सूचना द्याव्यात, अशा सूचनाही जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी बैठकीत दिल्या.
पंढरपूरातील कार्तिक यात्रा काळात स्वच्छतेला प्राधान्य द्या, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या सुचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 2:00 PM
आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २४ : पंढरपुरातील धोकादायक इमारती, मठ आदींना वारंवार नोटिसा देऊनही त्या हटविण्यात आलेल्या नाहीत. कार्तिकी एकादशीच्या तोंडावर या इमारती तत्काळ पाडून टाका, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी पंढरपूर नगरपालिका मुख्याधिकाºयांना सोमवारी दिले. यात्रा काळात स्वच्छता महत्त्वाची आहे. त्याला प्राधान्य देऊन नियोजन करा, असेही त्यांनी ...
ठळक मुद्देपंढरपुरातील धोकादायक इमारती तत्काळ पाडून टाकायात्रा काळात स्वच्छता महत्त्वाचीवारकरी-भाविकांना समाधान वाटावे अशा प्रकारे स्वच्छतेचे नियोजन करा