बार्शी : शिकवणीला गेलेल्या एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिला पळवून नेणाऱ्याला विशेष सत्र न्यायालयाचे न्या. जयेंद्र जगदाळे यांनी पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
याप्रकरणी शहर पोलिसांनी तपास करून आरोपी आशीष गायकवाड यास अटक करून विशेष सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली. याबाबत पीडित मुलीच्या आईने पोलिसात तक्रार देताच पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. या घटनेचा तपास महिला पोलीस कॉन्स्टेबल सविता जाधव व पोलीस नाईक श्रीमंत खराडे यांनी केला. तपासादरम्यान २२ जुलै रोजी त्याला मुलीसह ताब्यात घेतले होते.