बाळकृष्ण दोड्डी, सोलापूर : जिल्ह्यातील रिक्त पोलीस पाटील पदांची भरती प्रक्रिया सुरू असून मंगळवारी, १२ सप्टेंबर राेजी संबंधित पंचायत समिती कार्यालयात प्रवर्ग निहाय महिला आरक्षण सोडत कार्यक्रम होणार आहे. दुपारी बारा वाजता आरक्षण सोडत कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती माढा उपविभागीय अधिकारी तथा पोलीस भरती प्रक्रिया समितीचे अध्यक्ष प्रियंका आंबेकर यांनी दिली.
माढा तालुक्यातील २५ अन् करमाळा तालुक्यातील २३ पोलीस पाटील पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे. माढा उपविभागातील माढा तालुक्यातील लोंढेवाडी, सापटणे भो, अंजनगाव खे, उजनी मा., रोपळे खु, अकुंभे, शेडशिंगे, तांदुळवाडी, शेवरे, तडवळे म., वेणेगाव, वडाचीवाडी अ.ऊ, बुद्रुकवाडी, बिटरगाव, ढवळस,भोगेवाडी, शिंगेवाडी, कव्हे, महादेववाडी, आकुलगाव, रुई, आढेगाव, सुर्ली, भुताष्टे तसेच करमाळा तालुक्यातील वडगाव ऊ, वडगाव द, पिंपळवाडी, जातेगाव, खडकी, कोर्टी, सावडी, विहाळ, बिटरगाव वां, पारेवाडी, हिंगणी, भगतवाडी, कोंढार चिंचोली, झरे, लव्हे, वडाचीवाडी, बाळेवाडी, धायखिंडी, पोफळज, हिसरे, निमगाव ह, शेलगाव क, बोरगाव आदी ठिकाणी रिक्त पोलीस पाटील पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे.