पंढरपुर तालुक्यातील ७२ ग्रामपंचायतींची मुदत संपल्यामुळे पंचवार्षिक निवडणूक घेण्यात येत आहे. कोरोनामुळे अनेक ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. आता त्याची प्रक्रिया सुरू झाली झाली आहे. बुधवार, दि. २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर या आठ दिवसांच्या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे.
पंढरपूर पंचायत समितीचे शेतकरी भवन, तहसीलचे शासकीय धान्य गोडाऊन, रायगड भवन व तहसीलच्या आवारात अशा चार ठिकाणी विभागनिहाय उमेदवारी अर्ज भरण्याची सोय करून देण्यात आली आहे. त्यासाठी विभागनिहाय ५१ निवडणूक निर्णय व ७२ सहायक निवडणूक निर्णय असे १२३ निवडणूक निर्णय अधिकारी नेमण्यात आले आहेत. त्यांच्या मदतीला मदतनीस ही देण्यात आले आहे.
--
दाखले, आवश्यक कागदपत्रांसाठी गर्दी
निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन १५ दिवसांचा कालावधी उलटला. मात्र, आजपासून प्रत्यक्षात निवडणूक अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांकडून जातीचे दाखले, उत्पन्न, रहिवासी व अन्य आवश्यक कागदपत्रे जमविण्याची धावपळ सुरू आहे. तलाठी, ग्रामसेवक, हे सर्व संबंधित अधिकारी तहसिल, व पंचायत समितींमध्ये आहेत.
---
फोटो : २२ पंढरपूर इलेक्शन
पंढरपूर तहसील कार्यालयाच्या शासकीय धान्य गुदामात निवडणूक अर्ज भरून घेण्यासाठी अशी व्यवस्था करण्यात आली आहे.