कोल्हापूर : ग्राहकांच्या बँक खात्यावर गॅस सिलिंडरचे थेट अनुदान जमा करण्याच्या योजनेला नववर्षाच्या मुहूर्तावर सुरुवात झाली आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या बँक खाते लिंकिंगला ग्राहकांकडून थंडा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. ३१ मार्चपर्यंत मुदत असल्याने ग्राहक निवांत असले तरी यामुळे गॅस कंपन्यांचे मात्र धाबे दणाणले आहे. हे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी त्यांनी ग्राहकांना सहकार्याचे आवाहन केले आहे.डिसेंबरपर्यंत जिल्ह्यातील २ लाख ३५ हजार ग्राहकांचे लिंकिंग झाले असून, हे प्रमाण ३४ टक्क्यांच्या आसपास होेते. नववर्षाच्या मुहूर्तावर अनुदान जमा होण्याच्या योजनेला सुरुवात झाल्याने त्याला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा होती; परंतु आतापर्यंत केवळ चार ते पाच टक्केच भर लिंकिंगच्या टक्केवारीत पडली आहे. ३१ मार्चपर्यंत लिंकिंगसाठी मुदत देण्यात आल्याने ग्राहक निवांत आहेत. ग्राहकांशी संपर्क केल्यावर गॅस वितरकांना कशाला गडबड करताय, अजून दोन महिने आहेत, अशी उत्तरे त्यांच्याकडून मिळत आहेत. लिंकिंगचे प्रमाण असेच कमी राहिले तर हे काम वेळेत पूर्ण होणार नाही, अशी भीती गॅस कंपन्यांना वाटत आहे. प्रत्येकाने जर मार्चनंतर लिंकिंग करायचे म्हटल्यास त्यावेळी गॅस वितरक व बँकेच्या यंत्रणेवर मोठा ताण पडणार आहे. वेळेत लिंकिंग झाले नाही तर ग्राहकांना सरकारी अनुदानाला मुकावे लागणार आहे.लिंकिंग न होण्याची कारणे प्रक्रिया हेलपाटे मारावी लागणार असल्याने ग्राहक नाखूशलिंकिंग केल्यावर सिलिंडरचा दर ४० रुपयांनी महागलिकिंग केल्यावर सिलिंडरची सर्व रक्कम ७६० रुपये एकदम द्यावी लागणारकाँग्रेस सरकारनेही लिंकिंगसाठी आग्रह धरला व अचानक तो मागे घेतल्याने तसेच होईल असा ग्राहकांचा समज
गॅस ‘लिंकिंग’ची प्रक्रिया गारठली
By admin | Published: January 08, 2015 11:52 PM