पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्तीची झीज थांबवण्यासाठी सुरु करण्यात आलेली वज्रलेपाची प्रक्रिया बुधवारी पूर्ण झाली आहे. या वज्रलेपा दरम्यान सिलिकॉन रेझिंगची पावडर आणि विशिष्ट प्रकारच्या द्रव पदार्थाचे मूर्तीवर लेपन करण्यात आले. यामुळे मुर्तीचे मूळ रुप टिकून राहणार आहे. त्याचबरोबर आयुष्य वाढण्यास मदत होणार असल्याचे मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज यांनी सांगितले.
श्री विठ्ठल आणि रूक्मिणीमातेच्या मूर्र्तीची मंगळवारी स्वच्छता करण्यात आली. तर बुधवारी वज्रलेपन करण्यात आले. भारतीय पुरातत्व रसायनतज्ञ, पुरातत्व संवर्धन संशोधन प्रयोगशाळा आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे उपअधिक्षक श्रीकांत मिश्रा यांनी हे काम पूर्ण केले.
श्री विठ्ठलाची मूर्ती ही वालुकामय आहे. त्यामुळे या मूर्तीचा अभ्यास करून पुरातत्व विभागाकडून सिलिकॉन रेंझिंगच्या पावडर सारखा पदार्थ आणि विशिष्ट प्रकारचा द्रवपदार्थ एकत्र करून याचे मिश्रण लेपन म्हणून विठ्ठल मूर्तीवर लावले आहे. यानंतर सदरच्या मूर्तीचे आयुर्मान हे ५ वर्षानी वाढले जाते. मात्र प्रत्यक्षात मूर्ती संवर्धनासाठीचे योग्य वातावरण निर्माण झाले. तर निश्चितच यांचे आयुर्मान हे पाच वषार्हून पुढे तीन ते चार वर्षापर्यत राहू शकते, असे पुरातत्व विभागाच्या तज्ञांनी सांगितले. विठोबाच्या मूर्ती समवेतच रूक्मिणीमातेची मूर्ती ही गुळगुळीत पाषाणाची आहे. या मूर्तीच्या पाषणाचा अभ्यास करूनच लेपन केले असल्याचे ह.भ.प. गहणीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.पंढरपूरची विठोबाची मूर्तीचे संवर्धन हे पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शक सुचनानुसार करण्यात येत आहे. सदरच्या वज्रलेपनानंतर मूर्तीवर कुठल्याही प्रकारचे दुष्परिणाम होणार नाहीत. उलट मूर्तीचे संवर्धन अधिक काळ होण्यास मदत होणार आहे.- विठ्ठल जोशीकार्यकारी अधिकारी, श्री विठठल रूक्मिणी मंदिरे समिती , पंढरपूरविठ्ठल मुर्तीवर चौथ्यांदा झाला वज्रलेपपुरातत्व रसायनतज्ञ, संवर्धन संशोधन प्रयोगशाळा, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, औरंगाबाद यांच्याकडून श्री विठ्ठल रुक्मिणी मुर्तींवर सन १९८८, २००५ व २०१२ मध्ये करण्यात आला आहे. त्यानंतर २४ जून २०२० रोजी वज्रलेप करण्यात आला आहे.