अकलूज : शंकरनगर अकलूज येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचा सन २०२०-२१ मधील उस गळित हंगामात १० लाख ५२ हजार ५०० क्विंटल साखर पोती उत्पादन करुन हंगामाचा सांगता समारंभ केला.
सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याच्या चालू हंगाामात ५९ वा उस गळित हंगाम पार पडला. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि चेअरमन जयसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळ, उस उत्पादक सभासद, वाहतूकदार,उस तोडणी कामगार,कारखान्याचे अधिकारी,कर्मचारी यांच्या सहयोगातून हंगाम पार पडला.
या हंगामात ९ लाख ९३ हजार ८८२ मेट्रिक टन उसाचे गाळप झाले. १० लाख ५२ हजार ५०० क्विंटल साखर पोत्याचे उत्पादन झाले. तसेच सहवीज निर्मिती प्रकल्पात ८ कोटी ६५ लाख ४३ हजार ३१ युनिट वीज निर्मिती झाली आहे. यापैकी ५ कोटी ३६ लाख २३ हजार ९३२ युनिट विजेची निर्यात करण्यात आली. उपपदार्थ प्रकल्पातील डिस्टलरीमधे ९० लाख ९४ हजार ८१७ लिटर्स रेक्टिफाईड स्पिरीट, ६० लाख ५८ हजार ३२३ लिटर्स इथेनॉल उत्पादन झाले. ॲसेटीक ॲसिड प्रकल्पात ७२७ मेट्रिक टन ॲसिटाल्डीहाईड व ७७३ मेट्रिक टन ॲसेटीक ॲसिडची निर्मिती झाल्याची माहिती कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले यांंनी सांगितली.