सोलापूर - बिल मंजूर करून घेण्यासाठी ७० हजार रूपये लाचेची मागणी करून पहिला हफ्ता ३० हजार रूपये स्वीकारताना माळशिरस नगरपंचायत कार्यालयातील प्रकल्प व्यवस्थापन सल्लागारास सोलापूरलाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
देविदास बाळासाहेब कावळे (वय ३० ) असे लाच स्वीकारलेल्या सल्लागाराचे नाव आहे. याप्रकरणी माळशिरस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक संजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कविता मुसळे, पोलीस अंमलदार प्रमोद पकाले, स्वप्निल सण्णके यांनी यशस्वीपणे पार पाडली.