शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

सोलापूरातील गाळ्यांच्या प्रस्तावित ई-निविदेस स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 12:03 PM

मूळ गाळेधारकांना न्याय देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

ठळक मुद्दे१३८६ गाळेधारकांना तूर्त दिलासा महापालिकेच्या तिजोरीतील खडखडाट कायम राहणार गाळेप्रश्नांवर आक्रमक झालेल्या विरोधी सदस्यांना निधीबाबत ओरड

सोलापूर: भाडेकराराची मुदत संपलेल्या महापालिकेच्या मेजर व मिनी गाळ्यांची भाडेवाढ ठरविण्यासाठी प्रशासनाने प्रस्तावित केलेल्या ई-निविदा प्रक्रियेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिल्याची माहिती महापौर शोभा बनशेट्टी यांनी लोकमतशी बोलताना दिली. 

मेजर व मिनी गाळ्यांचे बाजारभावाप्रमाणे भाडे ठरविण्याकरिता आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी मेजर गाळ्यांची ई-निविदा काढण्याचा प्रस्ताव तयार केला होता. या प्रस्तावाला गाळेधारक व्यापाºयांनी तीव्र विरोध करीत धरणे व मोर्चा आंदोलन केले. सोलापूर बंदची हाक दिली. याची दखल घेत महापौर शोभा बनशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आमदार आडम मास्तर, भाजपचे शहर अध्यक्ष अशोक निंबर्गी, गाळे संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक मुळीक, बसपाचे गटनेते आनंद चंदनशिवे, गणेश पुजारी, नागेश वल्याळ, संतोष भोसले, नगरसेविका संगीता जाधव, देवाभाऊ गायकवाड, केतन शहा, कुशल देढीया, अशोक आहुजा, विश्वजीत मुळीक, सलीम मुल्ला, श्रीशैल बनशेट्टी यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी नागपूरला रवाना झाले होते.

सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी गुरुवारी दुपारी विधानभवनात मुख्यमंत्री फडणवीस यांची शिष्टमंडळास भेट घालून दिली. महापौर बनशेट्टी, आडम मास्तर यांनी गाळेधारकांचा प्रश्न मांडला. सहकारमंत्री देशमुख यांनी व्यापाºयांना न्याय देण्याची मागणी केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिष्टमंडळाने दिलेले निवेदन स्वीकारले.

गाळ्यांसंबंधी शासनाने काढलेल्या परिपत्रकात भाडेवाढ ठरविण्यासंबंधी ई-निविदा काढा, असे कुठेच म्हटलेले नाही. त्यामुळे या पद्धतीचा अवलंब करू नये, अशी महापालिका प्रशासनाला सूचना केली जाईल. गाळेभाडेवाढीचे धोरण ठरविताना मूळ गाळेधारकांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाईल, असे आश्वासन दिले. महापालिकेच्या अंदाजपत्रकात जी अपेक्षित गाळेभाडेवाढ गृहीत धरली आहे, त्याप्रमाणे रेडिरेकनर किंवा त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने भाडेवाढ देण्यास व्यापारी तयार असल्याचे मुख्यमंत्र्यांना सांगितल्याचे महापौर बनशेट्टी यांनी स्पष्ट केले. पाणीपुरवठा योजनेचा दुसरा टप्पा करण्यासाठी ३०० कोटी द्यावेत, अशी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केल्याचे त्यांनी सांगितले. 

पालकमंत्री गट अनभिज्ञगाळेप्रश्नी निर्माण झालेल्या प्रश्नांवर सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी पुढाकार घेतला व मुख्यमंत्र्यांशी भेटून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे सहकारमंत्री देशमुख यांनी गुरुवारी व्यापाºयांना दिलासा दिला. या प्रक्रियेत पालकमंत्री विजयकुमार देशमुख व त्यांच्या गटाचे सदस्य कोठेच दिसत नव्हते. महापौरांनी नागपूरला जाण्याचा अचानक निरोप दिल्याने जाणे शक्य झाले नाही, पण आज नागपुरात काय निर्णय झाला, याबाबत माहिती नाही, अशी प्रतिक्रिया सभागृहनेते संजय कोळी यांनी दिली. 

१३८६ गाळेधारकांना दिलासा...च्मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टमंडळास महापालिकेच्या प्रस्तावित ई-निविदा प्रक्रियेबाबत आश्वासन दिल्यामुळे १३८६ गाळेधारकांना तूर्त दिलासा मिळाला आहे. पण आता ही प्रक्रिया थांबली तरी महापालिकेच्या तिजोरीतील खडखडाट कायम राहणार आहे. नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांना दीड वर्ष होत आले तरी विकासकामासाठी रुपया मिळालेला नाही. आता ही ओरड आणखी वाढणार आहे. गाळेप्रश्नांवर आक्रमक झालेल्या विरोधी सदस्यांना निधीबाबत ओरड करण्यास संधी राहिलेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडून विशेष निधी आणण्यासाठी अशी ताकद लावावी लागणार आहे. 

शहराच्या विकासासाठी निधी आवश्यक असल्याने माझा प्रामाणिक प्रयत्न होता. शासनाच्या आदेशाप्रमाणे मला अंमलबजावणी करावी लागेल. गाळेप्रश्नी मुख्यमंत्र्यांनी काय निर्णय दिला आहे, हे लेखी परिपत्रक आल्यावरच समजेल.- डॉ. अविनाश ढाकणे, आयुक्त, सोमपा

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका