सोलापूर : जिल्ह्यात उभारलेल्या चारा छावण्या, वाळू आणि सिमेंट बंधारा उद्ध्वस्त प्रकरणात मुख्यमंत्री, मंत्रालयीन सचिव आणि महसूलमंत्री यांच्याकडून आयएएस व राजपत्रिक अधिकाºयांना संरक्षण मिळत असल्याचा आरोप किसान आर्मी व वॉटर आर्मीचे संस्थापक प्रफुल्ल कदम यांनी केला आहे. शासनाच्या निषेधार्थ हिवाळी अधिवेशनानंतर राज्यभर गांधीगिरी मार्गाने आंदोलन करणार असल्याचेही कदम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
ते म्हणाले की, वाळू निर्गत धोरणातील शासकीय नियम व अटींचा भंग करून बेकायदेशीर वाळू तस्करी करण्यासाठी ठेकेदारांना सहकार्य केले आणि राष्ट्रीय हरित लवादामध्ये खोटी प्रतिज्ञापत्रे सादर केल्याचा तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे आणि अपर जिल्हाधिकारी प्रवीण देवरे यांच्यावर आरोप झाला़ तसेच २०१३-१४ साली सांगोला तालुक्यात चारा छावणी घोटाळ्यात तत्कालीन विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम, उपविभागीय अधिकारी बाबासाहेब बेलदार, तहसीलदार नागेश पाटील यांच्यावर आरोप झाला़ जिल्ह्यात दोन सिमेंट बंधारे बेकायदेशीररित्या उद्ध्वस्त केल्याबद्दल आणि बेकायदेशीर कारवाई केल्याचा तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्या विरोधात आपण स्वत: अनेक पुरावे सादर केले़ यावर संबंधित अधिकाºयांवर कारवाई होऊ शकली नाही़ सिमेंट बंधाºयात तुकाराम मुंढे यांची प्रशासकीय कारवाई अत्यंत बेकायदेशीर होती, यावर उच्च न्यायालयाच्या निकालाने शिक्कामोर्तब केले आहे.
सांगोल्यातील चारा छावणी घोटाळ्यात एक वर्षानंतर एक वर्षासाठीचा ११ कोटी ३६ लाखांचा दंड शासन खात्यात जमा झाला. उच्च न्यायालयाच्या भीतीपोटी तब्बल चार वर्षांनंतर संस्थाचालकांवर गुन्हे दाखल झाले़ मात्र अधिकाºयांनी संगनमताने कारभार केला आणि त्यांना शासन पाठीशी घालत आहे़ तत्कालीन विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम, उपविभागीय अधिकारी बाबासाहेब बेलदार, तहसीलदार नागेश पाटील या दोषी अधिकाºयांना शासनाने संरक्षण दिल्याचा आरोप कदम यांनी केला.
तुकाराम मुंढे यांच्या नियंत्रणाखालील बेकायदेशीर वाळू उत्खनन, तहसीलदारांनी सादर केलेले अहवाल, नव्या जिल्हाधिकाºयांनी दाखल केलेले गुन्हे आणि केलेली दंडात्मक कारवाई, राष्ट्रीय हरित लवादामध्ये दाखल केलेले परस्परविरोधी खोटी प्रतिज्ञापत्रे, कोर्ट, कमिशन रिपोर्ट आदी पुरावे कदम यांनी सादर केले़ या प्रकरणांमध्ये त्यांच्यावर कारवाई होऊ शकलेली नाही़ शासनाच्या या धोरणाविरोधात हिवाळी अधिवेशन संपताच डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यभर आंदोलन छेडणार असल्याचे कदम यांनी सांगितले़
प्रभाकर देशमुख राष्ट्रवादीचे हस्तक : कदमच्शरद पवार हे खासदार असताना माढा लोकसभा मतदारसंघातील २०१३-१४ च्या चारा छावणी घोटाळ्यात तत्कालीन विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम, उपविभागीय अधिकारी बाबासाहेब बेलदार आणि तहसीलदार नागेश पाटील हे अडकले आहेत़ आता हे अधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे हस्तक असल्याचा आरोप प्रफुल्ल कदम यांनी केला आहे़ प्रभाकर देशमुख हे उघडपणे माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून कामाला लागले आहेत, ते खरोखरच हस्तक असल्याचे ते म्हणाले़