सोलापूर : देशाचं भवितव्य असलेल्या; पण बिकट परिस्थितीतून वाट काढत शिक्षण घेणाºया सोलापुरातील २७० शाळकरी मुला - मुलींच्या पायांची ‘लोकमत’ने काळजी घेतली. दिवाळीनिमित्त ‘एक पणती सहकार्याची’ हा विशेष उपक्रम राबवून या मुलांना स्कूल शूजचे आज वाटप करण्यात आले.
‘लोकमत’ सखी मंच आणि बाल विकास मंचने श्री धूत सिल्क सारीज्, पी. पी. पटेल फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट, चरण पादुका ट्रेडर्स, अम्मा बिर्याणी यांच्या सहकार्यातून थोबडे वस्ती येथील रितेश विद्यालयात हा अनोखा उपक्रम राबविला. यावेळी मंचावर श्री धूत सिल्क सारीज्चे पुरुषोत्तम धूत, पी़ पी़ पटेल फाउंडेशनचे जयेश पटेल, चरण पादुका ट्रेडर्सचे हनुमंत बनसोडे, अम्मा बिर्याणीचे नितीन वनेरकर, शाळेच्या मुख्याध्यापिका नीता कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती़ मान्यवरांच्या हस्ते लोकमतचे संस्थापक-संपादक स्वातंत्र्य सेनानी स्व़ जवाहरलालबाबूजी दर्डा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना श्रध्दांजली वाहिली. त्यानंतर सखी मंच विभाग प्रतिनिधी श्रद्धा अध्यापक, माधवी उप्पीन, धनश्री, द्राक्षायणी यांनी फराळाचे वाटप केले.
यावेळी मुलांना संबोधित करताना पटेल, बनसोडे म्हणाले, प्रत्येक विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास केला पाहिजे़ आपल्याला जर मोठे व्हायचे असेल तर अभ्यासाशिवाय पर्याय नाही़ अभ्यास करण्यासाठी नेहमी शिक्षकांची मदत आपण घेतली पाहिजे, असेही ते म्हणाले.धूत म्हणाले, अभ्यास केल्याशिवाय यश मिळत नाही़ यामुळे विद्यार्थ्यांनी नेहमी अभ्यास करत रहावे़ यश आपल्यामागे पळत येईल़ जर अभ्यास करताना कोणत्याही शैक्षणिक साहित्याची गरज असेल तर आम्ही सदैव मदतीसाठी तयार राहू असे आश्वासन त्यांनी दिले़ मुख्याध्यापिका निता कांबळे म्हणाल्या, आमच्या विद्यालयामध्ये ८०० विद्यार्थी शिक्षण घेत असून मंथन परीक्षेत राज्यातही आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तेची चुणूक दाखवली आहे़ अशा विविध शैक्षणिक कार्यक्रमामध्ये अग्रेसर असणाºया या मुलांसाठी जो उपक्रम केला आहे त्याबद्दल मी ‘लोकमत’ चे आभार मानते असे मत त्यांनी व्यक्त केले़ तसेच या उपक्रमाबद्दल शाळेच्या संस्थापिका विजयाताई थोबडे यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी सहशिक्षिका वर्षा मोरे, मनीषा जाधव, आशा गुमटे, डिंपल जगताप, शाहिदा मुलाणी, पवन कांबळे, समाधान पांढरे हे उपस्थित होते़ यावेळी अनुष्का लोखंडे, चैत्राली पांडव, नेहा पांढरे, प्रणाली कांबळे, जोया शेख, समृद्धी वाघमारे, सिफा शेख, तेजस्विनी आतकरे, खुशी शेख या विद्यार्थ्यांनी स्वागतगीताने मान्यवरांचे स्वागत केले.
मुलांचे चेहरे खुलले !- दिवाळीनिमित्त लोकमत सखी मंच व बालविकास मंचच्या ‘एक पणती सहकार्याची’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना मंगळवारी भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी अचानक मिळालेल्या भेटवस्तूमुळे मुले भारावून गेली़ यामुळे त्यांच्या चेहºयावर दिवाळीच्या सुट्टीपूर्वीचा आनंद ओसंडून वाहत होता़ त्यांचे चेहरे आनंदाने खुलले होते़ यानंतर आणखी भर पडली ती म्हणजे सखी मंचच्या विभाग प्रतिनिधीद्वारे दिलेल्या गोड पदार्थांमुळे़